महाराष्ट्र

Indian Air Force : वायूवीरांच्या वादळाने थरथरतोय पाकिस्तान 

Operation Sindoor : ऑपरेशन अजूनही थांबलेले नाही 

Post View : 42

Author

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपात दहशतवादाला निर्णायक प्रतिउत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाचं हे ऑपरेशन अजूनही जोमात सुरू असून, शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर अचूकपणे लक्ष ठेवले जात आहे.

भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा भारताच्या शौर्यावर व व्यूहरचनेवर खिळले आहे. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने शांततेचा संयम सोडून ठोस कारवाईचा मार्ग स्वीकारला. पाकिस्तानातील आतंकवादी अड्ड्यांना नष्ट करण्याचा निर्धारच भारताने घेतला. भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीरित्या आणि अचूकतेने पार पाडल्या. ही कारवाई अजूनही सुरू असून, शत्रूच्या हालचालींवर तीव्र आणि लक्षवेधी पद्धतीने प्रत्युत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेले नाही आणि हेच भारतीय सैन्याच्या संकल्पबळाचे प्रतीक आहे.

भारतीय हवाई दलाने स्पष्टपणे सांगितले आहे की, या ऑपरेशनमधील प्रत्येक हालचाल राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत आणि नियोजित स्वरूपाची आहे. ही मोहीम केवळ भावनांनी प्रेरित नसून ती तांत्रिक क्षमता, जागतिक पातळीवरील मूल्यांकन आणि भारताच्या सार्वभौमतेचा आदर यांवर आधारलेली आहे. युद्धाच्या तीन दिवसांनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीचा करार झाला. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा विश्वासघाताची भूमिका घेत, सीजफायरचे उल्लंघन करत गोळीबार सुरूच ठेवला. मात्र, भारतीय सैन्याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी ड्रोन्स, क्षेपणास्त्रं हवेतच निष्क्रिय करत भारतीय वायुसेनेने आपली कार्यक्षमता सिद्ध केली.

Operation Sindoor : भारताच्या ठिणग्यांनी पाकची बुद्धी ठिकाणावर

सावधगिरी बाळगा

भारतीय हवाई दलाने नागरिकांना आणि माध्यमांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. अटकळ, अफवा आणि अधिकृत नसलेली माहिती शेअर करणे टाळा. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील सर्व माहिती अधिकृतपणे योग्य वेळी दिली जाईल. सोशल मीडिया हे भारतीय हवाई दलाचे अधिकृत व्यासपीठ नाही. त्यामुळे कोणतीही माहिती अधिकृत मानू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. ऑपरेशन सिंदूर केवळ पाकिस्तानवर कारवाईचा भाग नाही, तर ती भारताच्या सामरिक क्षमतेची, धोरणात्मक स्पष्टतेची आणि जागतिक मंचावर आपली भूमिका अधोरेखित करणारी कामगिरी आहे. भारतीय हवाई दलाने ही मोहीम अत्यंत शिस्तबद्ध, नियोजित आणि परिणामकारक पद्धतीने सुरू ठेवली आहे.

युद्धाची भाषा टाळत, पण भारताच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता, हे ऑपरेशन पुढे नेले जात आहे. ऑपरेशन सिंदूर थांबलेले नाही. ते शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून, भारताच्या सुरक्षेसाठी निर्धाराने आणि धैर्याने सुरू आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!