महाराष्ट्र

Yashomati Thakur : पार्टी विथ डिफरेंस कुठे हरवली

Maharashtra : मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याने राज्याचे राजकारण तापले

Post View : 23

Author

महायुती सरकारच्या काही मंत्र्यांकडून शेतकऱ्यांविषयी करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यांवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दांत टीका करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजकारणात वक्तव्यांचे वजन अनेकदा खुर्चींपेक्षा जास्त ठरतं. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांमुळे जोरदार चर्चा रंगली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. या वक्तव्यामुळे शेतकरी वर्ग आणि राजकीय मंडळी दोन्ही अस्वस्थ झाले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा राजकीय संघर्ष हा केवळ वक्तव्यांपुरता मर्यादित नाही.

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनीही खळबळजनक वक्तव्य करत टीकेची झोळ उडवली आहे. शिरसाट यांनी आपली राजकीय कारकीर्द धोक्यांत असल्याचा देखील दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, लिलाव प्रक्रियेत कुठलाही भ्रष्टाचार नव्हता, तरीही माझी कारकीर्द डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे. कुटुंबावर वार करून माझी इमेज खराब करण्याचा षडयंत्र रचण्यात आला आहे, असे त्यांनी खंबीरपणे नमूद केले. शिरसाट यांनीही विरोधकांना धास्तावून ठेवणारा इशारा दिला आहे. जर वैयक्तिक आरोप सुरू ठेवले तर माझ्याकडे सगळ्या गोष्टींची माहिती आहे.

Yavatmal : खरीपपूर्वीच खत तस्करीचा भांडाफोड

मुख्यमंत्र्यांकडे लक्षवेधी सवाल

जेव्हा मी त्या काढायला सुरुवात करेन, तेव्हा महाराष्ट्र पाहील की संजय शिरसाट घराला आग लावायला कमी करणार नाही, असे सुस्पष्ट इशारे त्यांनी विरोधकांना दिले. हा इशारा सत्ताधाऱ्यांमध्येही गदारोळ निर्माण करणारा ठरला आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यशोमती ठाकूर यांनी सवाल केला आहे की, राज्याचे एक मंत्री शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरतात, तर दुसरा मंत्री थेट धमक्या देतो, नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय? या परिस्थितीला त्यांनी अनागोंदी म्हटले आहे, जी कधीही महाराष्ट्रात पाहायला मिळाली नव्हती.

ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष वेधले, असे घडामोडी चालू असताना मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करीत आहेत? हे राज्य कोण चालवत आहे? असं अकार्यक्षम मंत्री मंडळ राज्याचा बोजा हातात घेत आहे का? महाराष्ट्राची आर्थिक घडी सध्या बिकट अवस्थेत असून, अशा वेळी मंत्र्यांनी जोमदारपणे वागावे लागेल, अशी अपेक्षा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढे म्हणाले, ‘पार्टी विथ डिफरन्स चा धोसा लावणाऱ्या मंडळी याकडे लक्ष देतील का? महाराष्ट्र संकटात आहे. अशा वक्तव्यांनी राजकीय वातावरण आणखी तापत आहे.

Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या वेदनांवर शासनाची मलमपट्टी 

राजकारणात वक्तव्यांचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर संवेदनशीलतेऐवजी वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय रंगत तापलेली आहे. पुढील काळात या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावर कसा परिणाम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!