महाराष्ट्र

Akola : शिवसैनिकांमध्ये संभ्रम नाही, निर्णय एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच

Shiv Sena : अकोला महापालिका निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना मोठी संधी

Author

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शिवसेनेची आढावा बैठक पार पडली आहे. यावेळी कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही असा जिल्हाप्रमुखांनी विश्वास दिला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांत नवीन समीकरणं तयार होत असताना आणि नेत्यांच्या हालचालींना वेग आला असताना, शिवसैनिकांमध्ये काही संभ्रम निर्माण झाला होता. पक्षाची धोरणं, युतीचे निर्णय आणि तिकीट वाटपाबाबत अनेक प्रश्न त्यांच्या मनात घर करून होते. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पूर्व व पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली. जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि महानगरप्रमुख योगेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

बैठकीत शिवसैनिकांचा संभ्रम दूर करत स्पष्ट करण्यात आले की, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच होतील. बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख पिंजरकर आणि नवले यांनी शिवसैनिकांना विश्वास दिला की, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तालुक्यातील निवडणुकींमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला संधी मिळेल. कोणत्याही पदाधिकाऱ्यावर किंवा कार्यकर्त्यावर अन्याय केला जाणार नाही. संघटनेच्या मजबुतीसाठी आणि नवीन रक्ताला संधी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या आहे.

Election Commission : आरोपांचा पुरावा द्या, मगच उत्तर मिळेल

उपजिल्हाप्रमुखाची नियुक्ती

निवासी उपजिल्हाप्रमुख म्हणून अविनाश मोरे यांची नियुक्ती झाली आहे. कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय रोहनकार यांची निवड करण्यात आली. याशिवाय, विविध प्रभागांमध्ये आणि सर्कलमध्येही नियुक्त्या जाहीर केल्या. कुटासा सर्कलचे प्रमुख विरसिंग ठाकूर, भारतीय जीवन विमा सेलचे जिल्हाप्रमुख प्रकाश भट्टी, प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये विशाल धोटे व रितेश दुबे, तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये उपशहर प्रमुख म्हणून गौरव राईकवार व अक्षय येरमेकर यांना जबाबदारी देण्यात आली. शाखा आणि विभाग प्रमुखांच्या पदांवरही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

विभागप्रमुख म्हणून आशीष काळे, विनोद अग्रवाल, शशिकांत कोटरवाल आणि शाखा प्रमुख म्हणून अजित वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख गोपाल म्हैसणे, शशिकांत चोपडे, महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, शहरप्रमुख रमेश गायकवाड, आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत सर्व शिवसैनिकांनी एकमुखाने पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. आगामी निवडणुकींसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अकोल्यातील शिवसेना सामूहिक शक्तीच्या जोरावर महापालिका आणि अन्य निवडणुकींमध्ये यश संपादन करण्यासाठी सज्ज झाली आहे, असे चित्र या बैठकीतून दिसून आले.

Nagpur : गांजा तस्करीच्या व्हॉटसअॅप भाईला ओडिशातून अटक

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!