महाराष्ट्र

Sunil Kharate : ठाकरेंच्या मशालधाऱ्यांनी कमळ घेतला हाती

Amravati : महाविकास आघाडीत गळतीची लाट

Post View : 36

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील काही नेते महायुतीत पक्षप्रवेश करतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावतीतही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून माजी जिल्हाप्रमुखाने भाजपात पक्ष प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एका बाजूला तुटणारं, दुसऱ्या बाजूला जोडणारं असं एक अघोषित चक्र सुरूच असतं. पक्षांतरं आता कुणालाही अनपेक्षित वाटत नाहीत. गेल्या काही महिन्यांत महाविकास आघाडीतील विशेषतः शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातून कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या गळतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. कधी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले कार्यकर्ते आणि नेते आता एकाच मंचावर एकत्र येताना दिसत आहे. अशाच एका नाट्यमय घडामोडीने अमरावतीच्या राजकारणात नवा रंग भरला आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

एकीकडे महायुतीकडून जोरदार इनकमिंग सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून कार्यकर्त्यांची गळती वाढली आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराने गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता विधानसभा उमेदवारानेही जय महाराष्ट्र केला आहे. अमरावतीत ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले सुनील खराटे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं.

Anil Deshmukh : शब्द फुलांसारखे वाटले, पण काटे नंतर उगवले

पक्षांतराचा प्रभाव

विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी राजकीय खेळी सुरू ठेवली आणि अखेर भाजपच्या गोटात सामील झाले. मुंबईत प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेकडो समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या इनकमिंगचा परिणाम आगामी स्थानिक निवडणुकींमध्ये ठाकरे गटाला चापटी बसण्याची शक्यता आहे. मात्र लक्षवेधी बाब म्हणजे, बडनेरा मतदारसंघात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुनील खराटे यांना केवळ 7 हजार 121 मते मिळाली होती. त्या तुलनेत अपक्ष रवी राणा यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

निवडणुकीत प्रीती बंड यांना 60 हजार 836 मते मिळाली, तर खराटे यांच्या गळतीमुळे ठाकरे गटाला राजकीय डाव मांडताना पुन्हा नव्याने विचार करावा लागणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांनीही उद्धव ठाकरे गटाचा निरोप घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हाला स्वीकारले आहे. आपल्या निर्णयामागचं कारण स्पष्ट करताना पाटील यांनी म्हटलं, क्रीडा क्षेत्रातील प्रश्न आणि खेळाडूंच्या मागण्यांसाठी मी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Operation Thunder : एमडी ड्रग्जच्या गर्तेतून नागपूरची सुटका सुरू

सध्या महाविकास आघाडीतून सुरू असलेली ही पक्षांतराची लाट पुढील निवडणुकींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गट मजबूत होताना दिसत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला कार्यकर्त्यांच्या गळतीची चिंता भेडसावत आहे. अमरावतीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात ही गळती आणखी वाढल्यास आगामी निवडणुकीच्या रणनीतीत मोठा बदल करावा लागणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!