महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : काँग्रेसला देशभक्तीच्या सर्टिफिकेटची गरज नाही

Political Drama : राजकारणाची ‘गरमाई’ मालेगाव प्रकरणाने वाढली

Author

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील भाजपच्या भूमिकेवर टीका केली. शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धगधगत असलेल्या मुद्द्यांमध्ये मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. भाषेचा वाद, मंत्र्यांचे बेबाक वक्तव्य आणि मालेगाव प्रकरणाच्या निकालावरून भयंकर राजकीय तापस आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा हा पवित्र रंग असून त्याचा अपमान करू नये, म्हणून ‘भगवा दहशतवाद’ ऐवजी ‘सनातन दहशतवाद’ असा शब्द वापरण्याचा आग्रह व्यक्त केला. त्यांनी भाजपवर आरोप करत म्हटले की, जर केंद्राला आरोपी निर्दोष वाटत होते, तर 2014 मध्ये हा खटला का बंद केला नाही? ११ वर्षे खटला चालवून आता कोर्टात दोषी नव्हते असे म्हणणे फक्त भाजपच्या राजकीय खेळाचा भाग आहे, असेही त्यांनी म्हटले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपने जोरदार संताप व्यक्त केला. मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा काढून हिंदू धर्माचा अपमान केला, असे आरोप केले. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चाला थोडक्यात धक्का दिला. आम्ही शिवसेना-भाजपच्या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी टिळक भवनावर होतो. पण ते आमच्या कार्यालयापर्यंतच पोहोचले नाहीत. जर आले असते, तर त्यांना ‘Who Killed Karkare’ हे पुस्तक सप्रेम भेट देत मोर्च्याचा खरा रंग दाखवला असता, असे ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या बाजूने केवळ मोदी सरकार आणि भाजपच नव्हे तर शिवसेनेलाही चांगला फटकारा लगावला.

Yashomati Thakur : मतचोरीच्या मुद्द्यावर ठोस पुरावे लवकरच आणणार समोर

शहीद करकरे यांचा गौरव

हर्षवर्धन सपकाळ यांच्या मते, काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र शिवसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार पाकिस्तानच्या तुकड्यांच्या विरोधात आहे. भाजप आणि आरएसएस पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देत आहेत. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जिन्नाच्या मुस्लीम लिगशी युती होती. त्यामुळे जर शिवसेनेला मोर्चा काढायचा असेल, तर तो फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा, असा तिखट टोला त्यांनी दिला. मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांच्या निकालावरून राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेतल्या आहेत.

रेल्वे बॉम्बस्फोटाच्या निकालाविरोधात फडणवीस सरकारने त्वरित सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मालेगाव प्रकरणात अद्याप स्पष्ट भूमिका नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारला विचारले, मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाल्याबाबत सरकार सुप्रीम कोर्टात जाईल का? मालेगाव बॉम्बस्फोट कोणाचा कट आहे, याचे स्पष्टीकरण मिळाले पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे आणि तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाखतींचा अभ्यास करण्याची गरज मांडली. करकरे आणि आबा आताही असते तर मालेगाव प्रकरणाचा निकाल वेगळा असता, असे ते म्हणाले. तसेच, या प्रकरणात चार्जशीटमध्ये कसे बदल झाले, विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना प्रकरण सौम्य करण्यासाठी कोणते आदेश मिळाले याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Parinay Fuke : आता प्रत्येकाच्या तोंडी असेल दिव्याची यशोगाथा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!