महाराष्ट्र

Mahayuti : लाडकी बहिणींचा जलवा भारी, आमदार निधीला झाले बळी

Shiv Sena : गायकवाड-सरनाईक यांची फंड फाईट रंगली

Post View : 53

Author

संजय गायकवाड यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून निधी न मिळाल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय रंगभूमीवर सध्या महायुती सरकारची सत्ता आहे. पण या सत्तेच्या मागे असलेली लाडकी बहीण योजना आता एक मोठा प्रश्न बनली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात येते. ज्यामुळे सरकारला मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. मात्र, या योजनेचा परिणाम असा झाला की, मागील दहा महिन्यांपासून राज्यातील आमदारांना निधी मिळत नाही, अशी जबरदस्त आरोप सत्ताधारी शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांच्या या वक्तव्याने महायुतीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात निधी वळवला असल्याचा आणि अनेक विभागांचे पैसे रोखून ठेवल्याचा आरोपही पूर्वी केला जात होता. यामुळे राजकीय वर्तुळात या योजनेचा आणि निधी वितरणाचा वाद पेटलेला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सरकारच्या लोकाभिमुख धोरणांपैकी एक महत्त्वाचे पाऊल असले तरी, त्यामागील खर्चामुळे तिजोरीवर मोठा ताण येत असल्याची चर्चा आहे. सरकारला या योजनेसाठी आर्थिक कसरत करावी लागत असून, आमदारांना निधी देण्यात अडथळे येत असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला. ते म्हणतात की, मागील दहा महिन्यांपासून आमदारांना निधी मिळत नाही, ज्यामुळे त्यांचा कार्यभार वाढत आहे.परंतु, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याचा उघडसर निषेध केला आहे. ते म्हणतात की, सर्व आमदारांना निधी नियमितपणे मिळतोय, असे आमदारांनी केलेले आरोप निराधार आहेत. सरनाईक यांच्या या प्रतिक्रियेने शिवसेनेतच मतभेद उभे राहिले आहेत, ज्यामुळे पक्षाच्या अंतर्गत संघर्षाची चर्चा रंगली आहे.

Political War : मविआने उलगडले तेरा मतदारसंघाचे गुपित

आर्थिक तुटवड्याचा परिणाम

राज्यातील आर्थिक तुटवडा वाढल्यामुळे सरकारसाठी परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्याचा कर्जबोजा 5 वर्षांत 5 लाख कोटींवरून 9 लाख कोटींवर पोहोचला आहे. लाडकी बहीण योजना, ठेकेदारांचे मोठे देणे आणि वाढलेले कर्ज यामुळे राज्याची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा हा आरोप महायुती सरकारसाठी मोठा धक्कादायक आहे. त्यांनी विरोधकांसाठी निधी न देण्याच्या प्रथा आता सत्ताधाऱ्यांनाही लागू झाल्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला चालना मिळाली की आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल हे भविष्य सांगणे कठीण झाले आहे.संजय गायकवाड यांनी विरोधकांना सुनावून वाद आणखी तेज केला आहे.

गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करत म्हटले, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करता येणार नाही, कारण मी ओरिजनल आहे. या विधानामुळे पक्षात आणि विरोधकांमध्ये चर्चेचा नवाच भूकंप उडाला आहे. गायकवाड यांनी विरोधकांना लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी नको त्या मुद्द्यांवर आंदोलन करणार्‍या पक्षावरही टीका केली. नंतर मात्र या वक्तव्यावरून काहीशी मागे हटून, बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे दैवत असल्याचा आणि त्यांची शिकवण सर्वांनाच आवश्यक असल्याचा स्वीकार केला. मात्र, हा वाद अजूनही राजकीय चर्चेत भडकलेला आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना आर्थिक ताणाचा ओझा आणि निधीच्या तुटवड्यामुळे आता राजकीय वादांमध्ये धुडकावली जात आहे. संजय गायकवाड यांच्या धक्कादायक वक्तव्यांनी शिवसेनेत अंतर्गत गदारोळ वाढवला आहे. पुढील काळात या योजनेचा आणि निधीच्या प्रश्नाचा कसा विस्तार होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Prakash Ambedkar : आयोगाच्या वहीत पानं रिकामी, पण मतपेटीत कहर

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!