महाराष्ट्र

Prakash Ambedkar : आरएसएस-भाजपने ओबीसींचा घात केला

Akola : धम्मचक्र सोहळ्यातून मोदींवर कठोर प्रहार

Post View : 32

Author

अकोल्याच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंचावर प्रकाश आंबेडकरांनी RSS आणि भाजपवर ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचा घणाघाती आरोप केला. त्यांनी पंतप्रधान मोदींवरही ‘विश्वगुरू नव्हे, चपराशी’ असा तीव्र टोला लगावत जागतिक व्यासपीठावरील भारताच्या प्रतिमेचा मुद्दा उपस्थित केला.

अकोल्याच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या परखड आणि आक्रमक शैलीत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांच्या शब्दांनी उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले, तर राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. ओबीसी समाजाच्या विश्वासाचा गैरवापर आणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर त्यांनी सडेतोड भाष्य केले. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘विश्वगुरू’ नव्हे, तर ‘चपराशी’ असा खरमरीत टोला लगावत त्यांनी जागतिक व्यासपीठावरील भारताच्या प्रतिमेचा मुद्दा उपस्थित केला.

गेल्या 42 वर्षांपासून अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित होणाऱ्या या सोहळ्यात आंबेडकरांचे भाषण हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. यंदाही त्यांनी आपल्या बुलंद आवाजात सामाजिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध निषेध व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर, जे ओबीसी समाजाचे श्रद्धास्थान आहे. तिथे भागवत कधीच गेले नसल्याचा टोमणा मारत त्यांनी उपस्थितांना विचारमंथनाला भाग पाडले.

Akola Police : MPDA अंतर्गत बेकायदेशीर जुगारावर राज्यातील पहिली कारवाई

ओबीसींच्या विश्वासाचा घात

आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला उद्देशून सांगितले की, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरचा त्यांचा अंधविश्वास हाच त्यांच्या पतनाचे कारण ठरत आहे. ओबीसींचा सर्वात मोठा विश्वासघात या दोघांनीच केला आहे. आता स्वतःची लढाई स्वतः लढण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी समाजाला स्वावलंबनाचा मंत्र दिला. त्यांच्या मते, ओबीसींचे आरक्षण वाचवायचे असेल, तर भाजप आणि संघाच्या कार्यपद्धतीला आव्हान देणे क्रमप्राय आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना आंबेडकरांनी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. मोदी विश्वगुरू नव्हे, तर चपराशी आहेत, असा घणाघाती हल्ला चढवत त्यांनी जागतिक नेत्यांकडून मोदींना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा दाखला दिला. पाकिस्तानला जागतिक पाठबळ मिळत असल्याने भारताच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा देत त्यांनी मोदींना ‘बाय बाय’ करण्याचे आवाहन केले. मोदींचा अहंकार देशाला संकटात टाकत आहे, असा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाकडेही लक्ष वेधले. सरकारची मदत ही केवळ दिखाऊ असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले.

Bacchu Kadu : इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला नाही

दरम्यान, नागपूरच्या दीक्षाभूमीवर भंते विनयाचार्य यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला पुढे नेत दिल्लीत लवकरच देशव्यापी आंदोलन उभे राहणार आहे. अकोल्यातील आंबेडकरांचा हा आक्रमक पवित्रा आणि नागपूरातील आंदोलनाची हाक यामुळे बौद्ध समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!