प्रशासन

IPS Rushikesh Reddy : आयर्नमॅनच्या नेतृत्वात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक

Nagpur Police : जपानी पिस्तूल अन् अवैध दारू जप्त

Post View : 88

Author

नागपूर पोलिसांनी शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. ज्यात त्यांना यशस्वी कारवाइसह मोठी प्रगती मिळत आहे.

नागपूर शहर, ज्याला उपराजधानी म्हणून ओळखले जाते. ते आता गुन्हेगारीच्या जाळ्यातून मुक्त होण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, ज्यांना ‘आयर्नमॅन’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी शहराला पूर्णपणे गुन्हेगारीमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल सतत प्रयत्नशील आहे. विविध योजना आणि अभियान राबवून गुन्हेगारीला संपवायचे आहे. अलीकडेच घडलेल्या एका घटनेत, वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारांना शोधून काढण्यात यश आले असून, माल जप्त करण्यात आला आहेत. हे सर्व रेड्डी यांच्या मार्गदर्शनाने शक्य झाले आहे. ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

अभियानात पोलीसांनी शहर आणि ग्रामीण भागातून दोन गुन्हेगारांना अटक केले आहे. पाच जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत. यात अजय पाटील फिर्यादी आहेत. अल्पेश प्रमोद गजभिये (वय 21 वर्ष) आणि पियुष मारोतराव मलवंडे (वय 29 वर्ष) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगार दारू तस्करी आणि वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सामील होते. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत एका काळ्या सिल्वर रंगाच्या रिव्हॉल्वर (पिस्टल) मॅग्झिनसह जप्त करण्यात आले आहे. याची एकूण लांबी 16 सेमी आणि बॅरल 10 सेमी आहे.

Vijay Wadettiwar : आरक्षणाचा संघर्ष पुन्हा जिवंत

गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण

पिस्टलची किंमत अंदाजे 70 हजार रुपये आहे. तसेच, 5 जिवंत पिस्तली राऊंड (कारतूस) टायपर के.एफ. जप्त केले आहे. याची प्रत्येकी 1 हजार 500 किंमत असून, एकूण 7 हजार 500 रुपये किमतीचे कारतूस जप्त करण्यात आले आहे. याशिवाय, एका आकाशी रंगाच्या विवो कंपनीच्या मोबाईल फोनही जप्त केला आहे. त्याची किंमत 5 हजार रुपये आहे. तसेच, एक सिल्वर रंगाच्या दुसऱ्या रिव्हॉल्वरचे मॅग्झिनसह तपासले असता, त्याच्या बॅरलवर पाचद्र चित्र कोरलेले होते. त्यावर ‘MADE IN JAPAN’ असे लिहिलेले होते.

पिस्टलची एकूण किंमत 70 हजार रुपये आहे. या कारवायांमधून गुन्हेगारी आणि दारू तस्करीच्या प्रमाणाचे दर्शन घडते. तपास पथकातील अधिकाऱ्यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि इतर पोलिसांनी सहभाग घेतला. पोलीसांनी दारू तस्करी आणि अवैध वस्तूंच्या व्यापारावर कठोर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या कारवायांमुळे नागपूर पोलिसांची प्रभावीता आणि कर्तव्यनिष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

Yashomati Thakur : शेतकऱ्यांच्या वेदना नाही, फक्त निवडणूक दिसते

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!