महाराष्ट्र

विदर्भातील प्रदेशाध्यक्ष Rahul Gandhi यांना नको

वरिष्ठ पातळीवरून ठरले Maharashtra Congress साठी निकष

Post View : 18

Author

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बरीच उलाढाल सुरू आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना  हटविण्याची हालचाल सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आमदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. पटोले यांच्या जागी अमित देशमुख यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. कोणत्याही क्षणी त्याची घोषणा होऊ शकते. नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड करताना राहुल गांधी यांनी अनेक निकष ठरविले होते. त्या निकषांच्या आधारावर अमित देशमुख यांच्या नावावर एकमत झाल्याचं राहुल गांधी यांच्या जवळच्या एका नेत्यानं ‘द लोकहित लाइव्ह’ला सांगितलं. यंदा नवीन प्रदेशाध्यक्ष निवडताना राहुल गांधी यांनी बरेच ‘डोट्स’ ठरविले होते. त्यानुसार नवीन प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असू नयं, असं राहुल गांधी यांनी ठरविलं होतं.

विदर्भातील प्रदेशाध्यक्ष नको म्हणून अनेक नेत्यांच्या नावापुढं राहुल गांधी यांनी फुली मारली. अध्यक्षपदासाठी विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर याचं नाव आघाडीवर होतं. वडेट्टीवार यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळं त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.काँग्रेसला बरेच वर्षांपर्यंत महिला प्रदेशाध्यक्ष नव्हती. त्यामुळं यशोमती ठाकूर यांना प्रदेशाध्यक्ष केलं जावं असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी या दोन्ही नावाला नकार दिला.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

चव्हाणांचं नाव नव्हतं

प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाहीच चर्चेत आलं होतं.परंतु चव्हाण यांचं नाव दिल्लीमधील नेत्यांच्या तोंडी नव्हतं असं आता सांगितलं जात आहे. हे नाव केवळ महाराष्ट्रातून चर्चेसाठी पुढं आल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. बाळासाहेब थोरात, संतेज पाटील आणि अमित देशमुख यांचं नावही कालांतरानं पुढं आलं. गांधी यांनी देशमुख यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. त्यामुळं ते प्रदेशाध्यक्ष होतील असं सांगितलं जात आहे. मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आहे. गायकवाड यांच्या ऐवजी दुसरं नाव सध्यातरी चर्चेत नाही. लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. ही निवडणूक नाना पटोले यांच्या नेतृत्वात लढविली जाऊ नये, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे.

विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी जागा वाटप करताना चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप आता काँग्रेसचे नेते करीत आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयाचं श्रेय नाना पटोले यांना देण्यात आलं. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशाचं श्रेय देखील घ्यावं, असं काँग्रेस नेते उघडपणे बोलत आहेत. पक्षांतर्गत विरोध पाहता पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा आधीच देऊन ठेवला होता.आता हा राजीनामा मंजूर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!