महाराष्ट्र

Mahayuti : शिंदे-फडणवीस-पवार अस्सल टीमवर्कमध्ये व्यस्त

Maharashtra Assembly : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना ठणकावून इशारा 

Post View : 23

Author

महाराष्ट्राच्या सत्ताधारी युतीत फूट पडल्याच्या चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी ठाम प्रत्युत्तर दिले. शिंदे-फडणवीस-पवार तिघेही एकत्र निर्णय घेत असून, विरोधकांच्या अफवांना थारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील सत्ताधारी युतीतील समन्वयाबाबत विविध चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकटे सोडले जाणार नाही. सरकारमधील तिन्ही नेते शिंदे-फडणवीस-पवार एकत्रितपणे निर्णय घेत असून, विरोधकांनी अफवा पसरवण्याचे काम थांबवावे. आम्ही तिघेही समन्वयाने सरकार चालवत आहोत, विरोधकांचे अपप्रचार खपवून घेतले जाणार नाहीत,असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

विरोधकांकडून सातत्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयक्षमता आणि सरकारमधील समन्वयावर टीका केली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांचे काहीच चालत नाही, असे वक्तव्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी सरकार मजबूत असून, चुकीच्या बातम्या पसरवू नका, असा इशारा दिला.

Congress : बापूकुटीसमोर नतमस्तक होत सेवाग्रामच्या मातीत परिवर्तनाची नांदी

सत्ताधारी युतीचा समन्वय 

सरकारच्या कामकाजात कोणताही मतभेद नसल्याचे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, माध्यमांमध्ये समन्वयाबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात सरकार एकसंध आहे. कोणताही मंत्री बैठकीला उपस्थित नसला, तर तो नाराज आहे, असा चुकीचा अर्थ लावला जात आहे. बैठकीला कोणी गैरहजर असले, तरी याचा अर्थ मतभेद नाही. सरकारमध्ये निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील विकासकामे जलदगतीने सुरू असून, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार तिघेही सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Maharashtra Legislative Assembly : शिक्षकांच्या हक्कांसाठी नाना मैदानात

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिंदे सरकार सक्षम आहे आणि त्याचा कारभार देखील प्रभावीपणे सुरू आहे. युती सरकार मजबूत असून, विरोधक फक्त संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.विरोधकांकडून टीका होणे नवीन नाही, पण भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांची युती अधिक बळकट होत असून, राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यामुळे टीका करणारे विरोधक निराश होणार आहेत.

सरकार स्थिर 

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे नाट्य रंगत असले तरी सत्ताधारी नेते ठाम आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे-फडणवीस-पवार हे तिघेही एकत्रित निर्णय घेत आहेत आणि समन्वयाने सरकार चालवत आहेत.राजकीय खेळी कितीही सुरू असल्या, तरी महाराष्ट्र सरकार स्थिर आणि मजबूत असून, विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!