महाराष्ट्र

Akola Politics : साजिद खान पठाणांच्या उत्सव प्रेमाला भाजपने दर्शवला विरोध

BJP vs Congress : पोळा सणाने अकोला पश्चिमचे वातावरण केले दूषित

Post View : 53

Author

भाजप प्रदेशाध्यक्षाचे अकोला निवासी पीएने काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या धार्मिक उत्सव सहभागावर टीका केली आहे. यावरून शहरात राजकीय वाद निर्माण झाला आहे.

अकोला शहरात विधानसभा निवडणुकीच्या दीड वर्षानंतरही भाजप अकोला पश्चिम मतदारसंघातील पराभवाची जखम दाखवत अजूनही शहराचे वातावरण तापवते आहे. अकोला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पीए अक्षय जोशी यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण गेल्या वर्षभर विविध धर्माच्या सार्वजनिक उत्सवात हिरीरीने सहभागी होत आहेत. ज्यामुळे भाजपमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पोळ्याच्या दिवशी जुन्या शहरातील पोळा चौकात आयोजित बैलजोडी सजावट स्पर्धेत पठाणांची उपस्थिती पाहून अक्षय जोशी यांनी तीव्र विरोधक केला.

सोशल मीडियावर त्यांनी भाजपच्या गटांत आणि फेसबुकवर तक्रार करत आयोजक अनिल मालगे यांना विचारले, हिंदू पोळा सणात मुस्लिम आमदाराला का बोलावले? अक्षय जोशी यांच्या टीकेमुळे अकोला भाजपमध्ये वादंग निर्माण झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षाच्या पीएने आमदारासारखे थेट काँग्रेस आमदारावर टीका केल्याने महायुतीतील नेते चिडलेले दिसून येत आहेत. हे प्रकरण आता थेट पोलिसांपर्यंत गेले आहे. महायुतीच्याच मित्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या पीए विरुद्ध मित्र पक्षाच्याच एका सदस्याने पोलीस तक्रार केल्यामुळे आता अकोल्यामध्ये महायुतीमध्ये युती राहिली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Cabinet Decision : विदर्भाला जोडणार सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे

जातिवादक वक्तव्यामुळे तणाव

महायुतीला कोण प्रिय भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस की साजिद खान पठाण प्रिय असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल मालगे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, त्यांच्या मते, जातिवादक वक्तव्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. जोशी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, जे गाय आणि बैल कापतात ते कधीपासून पोळा साजरा करायला लागले? या विधानामुळे अकोल्यामध्ये सत्ताधारी महायुतीसाठी नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांपर्यंत गेलेल्या या प्रकरणामुळे महायुतीत युती टिकेल की नाही, हा विषय चर्चेचा ठरला आहे.

मराठी संस्कृतीत अतिथी देवो भव या मूल्याचे महत्त्व असते. अनिल मालगे यांनी पोळा सणानिमित्त पठाणांना आमंत्रित केले होते. अतिथी म्हणून त्यांचा सन्मान करणे आवश्यक होते. पठाण यांनी उत्सवात अंगावर गुलाल घेऊन सर्वांचा आनंद वाढविला, मात्र काही भाजप कार्यकर्त्यांनी याचा योग्य प्रतिसाद न देता संताप व्यक्त केला. अक्षय जोशी यांनी पठाण यांच्याविरोधात सोशल मीडियावर अतिशय विखारी शब्दांत टीका करताना कावड आणि पालखी सोहळ्याचे हिंदू आयोजकांनाही दलिंदर हिंदू असे संबोधले. या विधानामुळे आयोजक अनिल मालगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अकोला भाजप आधीच अडचणीत आहे. मात्र ता प्रकरणामुळे ती आणखीअडचणीत सापडते की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

Narendra Bhondekar : राजकीय दबावामुळे पालकमंत्रीपदाला रामराम

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!