महाराष्ट्र

Akola : सायकलच्या दुकानात बॅंकेचा कारभार

Bhandara : आयुध निर्माण स्फोट प्रकरणी सात अधिकारी अडचणीत

Post View : 41

Author

अकोल्यातील सायकलच्या दुकानात पोलिसांनी धाड टाकून 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त केली आहे. या पैशांचा हवालासंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अकोला शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. गोरक्षण रोडवरील न्यू शर्मा ब्रदर्स नावाच्या एका सायकल आणि फिटनेस सामान विक्रीच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला आणि तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांनी हा पैसा हवाला व्यवहाराशी संबंधित असण्याचा संशय व्यक्त केला आहे. या कारवाईत दीपक घुगे नावाच्या व्यक्तीकडून पांढऱ्या रंगाच्या दोन कापडी पिशव्यांमध्ये 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे गठ्ठे सापडले आहेत. संबंधित व्यक्ती या पैशांचा हिशेब देऊ न शकल्याने पोलिसांनी लगेचच नागपूर येथील आयकर विभागाला माहिती दिली. आता हा पैसा कायदेशीर आहे की काळ्या पैशांचा भाग, हे पुढील तपासाअंती स्पष्ट होईल.

सायकल आणि फिटनेस वस्तूंच्या दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडणे ही अत्यंत संशयास्पद बाब आहे. अकोला पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत दुकानाची झडती घेतली आणि मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरात अफवा आणि चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले की, हा संपूर्ण प्रकार हवाला व्यवहाराशी संबंधित असू शकतो. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी आयकर विभागालाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. आता यामागे कोणते मोठे नेटवर्क आहे का, याचा शोध घेतला जात आहे.\

Jaykumar Gore : जोपर्यंत देवाभाऊ पाठीशी, माझं कुणी वाकडं करू शकत नाही

भंडारा फॅक्टरी स्फोट

भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर आयुध निर्माणीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाचा तपास आणखी पुढे सरकला आहे. या दुर्घटनेतील निष्काळजीपणाच्या आरोपाखाली आणखी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे, महाप्रबंधक अनुज प्रसाद, आणि महाप्रबंधक ललित कुमार यांचा समावेश आहे. याआधीच या प्रकरणात चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे आता दोषी अधिकाऱ्यांची संख्या सातवर पोहोचली आहे.

चौकशीदरम्यान हे अधिकारी निष्काळजीपणाचे दोषी आढळले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या रिपोर्टवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Nagpur Curfew : दुपारी तीननंतर उपराजधानीत संचारबंदी संपुष्टात

यापूर्वीही अधिकारी निलंबित

स्फोट प्रकरणात यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते अधिकारी म्हणजे सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी देवेंद्र रामदास मिना, आदिल ज्युनियर वर्क मॅनेजर, मेन्टनन्स विभागाचे रशील फारुकी, सामान्य प्रशासन विभागाचे संजय सुरेश धपाडे आणि सेक्शन प्रभारी अधिकारी आनंदराव मधुकरराव फाये आहेत.

अकोला आणि भंडाऱ्यातील या दोन्ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. एका बाजूला सायकलच्या दुकानातून एवढी मोठी रोख रक्कम सापडल्याने व्यापारी आणि नागरीकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे आयुध निर्माणीतील स्फोट प्रकरणात आणखी तीन अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. आता या दोन्ही प्रकरणांची चौकशी कशी पुढे सरकते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Sanjay Raut : हिंदुत्त्ववाद्यांना तैमूर चालतो, पण औरंगजेबाची कबर नको

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!