अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकोल्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला होता. गणपती बाप्पाच्या भक्तीत रंगलेलं वातावरण यामुळे सारा महाराष्ट्र आनंदात न्हाऊन निघाला होता. पण या आनंदाच्या लाटेत अकोला शहरात एका भयंकर घटनेने सगळ्यांचे हृदय हेलावून टाकले. जिथे भक्ती आणि उत्साह यांचा संगम होता, तिथेच एका काळ्या कृत्याने सर्वांचे मन सुन्न झाले. शनिवार, 6 सप्टेंबर रोजी, दुपारी साडेचार वाजता घडलेली ही घटना अकोल्याच्या डाबकी रोड परिसरात घडली. जिथे गणेश विसर्जनाच्या तयारीने सर्वजण दंग होते.
घराघरातून नातेवाईक मिरवणुकीसाठी बाहेर पडले होते, पण याच वेळी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आयुष्यातील सर्वात काळरात्र ठरली. तिचे कुटुंब विसर्जनासाठी बाहेर गेले असताना, तौहिद समीर बैद नावाच्या नराधमाने तिच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. ही भयावह घटना समजताच अकोला शहरात खळबळ उडाली. संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. काही संघटनांनी मोर्चे काढले, तर काहींनी आरोपीला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले. पण या सगळ्या गोंधळात अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा आणि धैर्याचा परिचय दिला.
पोलिसांचा अथक शोध
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अर्चित चांडक यांनी तातडीने कारवाईचा बिगुल वाजवला. त्यांनी डाबकी रोड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि स्वतः तपासावर लक्ष ठेवले. 6 ऑक्टोबर 2025 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला गेला. चांडक यांनी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार केली, जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाली की, आरोपी तौहिद मध्यप्रदेश इंदूरला पळाला आहे. चांडक यांच्या आदेशानुसार पथक तातडीने इंदूरला पोहोचले.
शेवटी ११ सप्टेंबरच्या रात्री आरोपीला इंदूर येथे बेड्या ठोकण्यात आल्या. अकोल्यात संतापाची लाट उसळली होती. आरोपीच्या क्रूर कृत्याने समाजमाध्यमांवर तणाव वाढला होता. पण अर्चित चांडक यांनी आपल्या धैर्याने आणि तत्परतेने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. त्यांनी पथकाला स्पष्ट आदेश दिले, कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पकडा. चांडक यांच्या नेतृत्वाने पोलिसांचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या रणनीती आणि तपासाच्या बारकाव्यांनी पथकाला प्रेरणा मिळाली. अखेर, अथक प्रयत्नांनंतर पथकाने आरोपी तौहिद समीर याला अटक केली. या अटकेने अकोल्याच्या जनतेला दिलासा मिळालाआणि चांडक यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक सर्वत्र झाले.
Nagpur : देवाभाऊंच्या गृहनगरात अदानी-रिलायन्सच्या गुंतवणुकीने फुलणार समृद्धी
अर्चित चांडक यांनी केवळ एक पोलीस अधिकारी म्हणून नव्हे, तर अकोल्याच्या जनतेच्या रक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.