महाराष्ट्र

Anup Dhotre : पायाभूत सुविधांच्या रुळांवर अकोला

Akola अनुप धोत्रेंच्या प्रयत्नांनी घेतली गती

Post View : 29

Author

अकोल्याच्या विकासासाठी अनुप धोत्रे यांनी घेतलेली धडपड आता फळाला येत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि शहरी भागात पायाभूत सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

अकोला मतदारसंघात विकासाची गती वाढवण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या पाठबळाने नवे आयाम गाठले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली धोत्रे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्धता दाखवली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अकोला परिसरातील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने समन्वय साधला आहे. यामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळाली आहे.

लोहगड आणि सायखेड परिसरातील रेल्वे अंडरपासच्या निर्मितीमुळे 25 गावांना थेट लाभ होणार आहे. या प्रकल्पाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिल्याने स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धोत्रे यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत, स्थानिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे मार्गावरील अडथळे दूर होऊन ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन सुलभ होत आहे.

Nagpur Police : मतानींच्या शिलेदारांनी वाचवले अल्पवयीन बालिकेला

नव्या आशेचा प्रारंभ

लोहगड आणि अमनवाडी दरम्यानच्या मानवरहित रेल्वे गेट क्रमांक 95 च्या बंदमुळे 2016 पासून खापरखेडा, सायखेड, चौहगाव, धामधरी यासारख्या गावांतील नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत होता. रोडगेज कन्व्हेर्शनचे काम पूर्ण झाले असले, तरी अंडरपासच्या अभावामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. धोत्रे यांनी ही समस्या लोकसभेत उपस्थित करून रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आणि अंडरपासच्या निर्मितीला मान्यता मिळाली, ज्यामुळे रेल्वे मार्ग ओलांडण्याचे संकट टळले आहे.

खासदार धोत्रे यांनी केवळ लोहगड-सायखेड प्रकल्पापुरते मर्यादित न राहता, अकोला शहर आणि आसपासच्या गावांना जोडणाऱ्या डाबकी रोड गेटवरील अंडरपासच्या कामालाही गती दिली आहे. तेलारा, शेगाव, गायगाव, निंबा यासारख्या भागांना जोडणारा हा प्रकल्प स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या सहकार्याने धोत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वे व्यवस्थापनाशी समन्वय साधून अनेक विकासकामांना चालना दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अकोल्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधा सक्षम होत असून, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे समर्पण आणि दृष्टीकोन प्रशंसनीय आहे. अकोला आता विकासाच्या नव्या वाटेवर दमदार पावले टाकत आहे.

Ravikant Tupkar : पीक विम्याच्या थट्टेवर मंत्रालयात हल्लाबोल

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!