जालन्यात स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसाने लाथ मारली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना जालन्यात एक वेगळाच प्रकार घडला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येत असतात, अशी परंपरा आहे. यावेळी जालना जिल्ह्यात सत्ताधारी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावर पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान घडलेली घटना सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली.
जालन्यातील विभागाय पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलक शेतकऱ्यावर रस्त्यावरच सिनेस्टाईल उडी मारून बूटाचा फटका दिल्याचा व्हिडीओ लोकांसमोर आला. पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा कृतीवर नेटीझन्स आणि विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भररस्त्यात पोलीस असे वागतील, तर कुठे सुरक्षेची अपेक्षा करायची? असा सवाल निर्माण झाला. आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवर संताप व्यक्त करत शासनाने संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली. या घटनेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनीही आपला संताप व्यक्त केला.
Maharashtra : पंधराशे रुपयांची माया, निवडणुकीत महायुतीची जयमाला
लोकशाही पतनाची चिंता
कडूंनी स्पष्ट केले की, डीवायएसपीला बूटाचा फटका दिला नाही, तर त्या डीवायएसपीला देखील लाथ मारायला हवी होती. पंकजा मुंडे आले तरी मतदारांना बळजबरीने फटका दिला जात असेल, तर निवडणूक आल्यास त्या घरापर्यंत पोहचण्याचा निर्णय घेणारे लोकांनाही समजायला हवे, असे ते म्हणाले. बच्चू कडूंनी पंकजा मुंडेंनाही टोला लगावला, पालकमंत्र्यांनी निषेध नोंदवायला हवा होता. जर आमच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे पोलीस असे वागत असतील, तर निलंबन मात्र काही उपयोगाचे ठरणार नाही. त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होते की, ते पोलीस अधिकाऱ्यांच्या निषेधकार्यातील अपुरेपणाबाबत कठोर भूमिका घेत आहेत.
बच्चू कडूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींबाबतही आपले विचार मांडले. भाजपच्या कार्यालयात मतदान केंद्र असावे. त्यांना मतपेट्या हाताळायला द्या. निवडणूक खर्च वाया घालवण्याऐवजी भाजप स्वतः मतदान करून नगरसेवक निवडून आणावा, असे त्यांनी म्हटले. त्यांनी आपल्या मतदारसंघातील 13 हजार डबल नावे आणि लोकशाहीच्या पतनाची चिंता व्यक्त करत निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याचा इशारा दिला.बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यांवरही भाष्य केले. एकनाथ शिंदेंना लॉटरी का लागते, हे फक्त मंत्र्यांना आणि उद्योगपतिंना माहिती असते, सामान्य माणसाला मात्र नाही, असे ते म्हणाले.
Maharashtra : लोकांचे काम विसरले, तहसीलदार खुर्चीवर गायक बनले
