महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : उत्पादन वाढ अन् खर्च कमी करण्यासाठी नवा दृष्टीकोन

Chandrapur : बल्लारपूरची शेती समृद्धीची गतीवान धुरा

Post View : 54

Author

चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. धान बोनस, कृषी पंप आणि प्रशिक्षण केंद्रांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आणि उत्पादन वाढीला चालना मिळत आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर चंद्रपूरचे नाव शेतीच्या समृद्धीने उजळत आहे. याचे शिल्पकार आहेत आमदार सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्याचा संकल्प बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात साकार होत आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कृषी पंप विज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांच्या आढावा बैठकीत, मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. शेती ही शेतकऱ्यांना सक्षम बनवणारे शक्तीस्थान आहे, असे सांगत त्यांनी उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे यावर विशेष भर दिला. या बैठकीत भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. ज्यामुळे शेतीच्या प्रगतीचा मार्ग अधिक स्पष्ट झाला.

मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना गतीमान झाल्या आहेत. कृषी पंप, धान बोनस, कर्जमुक्ती आणि यांत्रिकीकरण यांसारख्या उपाययोजनांनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू केली. ज्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमुक्तीचा मुद्दा समाविष्ट करून शेतीला मजबुतीचा आधार दिला. चंद्रपूरसाठी 7 हजार मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन आणि कोरोमंडल कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे द्योतक आहे. पोभुर्णा तालुक्यातील सात शेतकऱ्यांना राज्य कृषी पुरस्कार मिळणे हे या प्रयत्नांचे यशस्वी फलित आहे.

Akola Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नेत्यांचे मनोमिलन

विकासाचे हिरवे पंख

चंद्रपूरमध्ये 80 कोटी रुपये खर्चाने उभारले जाणारे कृषी हाट शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. मुल येथील कृषी महाविद्यालय आणि अजयपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने स्थापन होणारे शेतकरी प्रशिक्षण केंद्र शेतीला आधुनिकतेची जोड देईल. धान बोनसचे 80 ते 90 टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. धान चुकऱ्यांचे पैसेही वितरित झाले. धान खरेदी केंद्रांसाठी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा आहे. ‘पोखरा’ आणि ‘किसान समृद्धी’ योजनांमध्ये बल्लारपूरच्या गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावात जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यामुळे शेतीला नवे आयाम मिळत आहेत.

IPS Rashmita Rao : महिला संरक्षणार्थ महाकालीच्या दशभुजा सक्रिय 

मुनगंटीवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात 5 हजार 3 किलोमीटर पानंद रस्त्यांचा निर्णय घेतला. ज्यामुळे मतदारसंघातील सर्व गावे जोडली गेली. माविमद्वारे महिला बचत गटांचे यांत्रिकीकरण आणि पुरुष बचत गटांची स्थापना ही शेतीला सामाजिक आधार देणारी पावले आहेत. बल्लारपूर मतदारसंघ शेतीच्या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहावा, यासाठी मुनगंटीवार सतत कार्यरत आहेत. त्यांच्या संकल्पाने शेतीचा विकास इतका आदर्श होईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बल्लारपूरचा उल्लेख होईल. या प्रयत्नांनी विदर्भातील शेतकरी आत्मविश्वासाने समृद्धीकडे वाटचाल करत आहे. शेती हा केवळ व्यवसाय नसून, आर्थिक स्थैर्याचा पाया बनला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!