सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट घेतली, ज्यामुळे देशातील राजकीय वातावरणात नवीन वळण आले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या रिक्ततेमुळे आगामी निवडणूक आणि संसदीय समीकरणे यावर देशाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
देशातील राजकीय वातावरण सध्या तणावपूर्ण आहे. उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे. या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती निवडीसाठी निवडणूक घेणे अनिवार्य ठरले आहे. भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असण्याबरोबरच राष्ट्रपती अनुपस्थित असताना त्यांची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे, सत्ताधारी आणि विरोधक पक्षांची रणनीती, तसेच संसदेतील आकडेवारी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सोमवारी झालेल्या भेटीमुळे देशाच्या राजकीय आणि लोकशाही वातावरणात चर्चेला गती मिळाली आहे. दोन्ही स्तंभ भारतीय लोकशाहीतील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आदिवासी समाजातून देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आहेत, तर सरन्यायाधीश भूषण गवई हे न्यायपालिकेच्या स्वायत्ततेचे प्रतीक आणि मागासवर्गीय घटकातून सर्वोच्च न्यायालयाच्या शिखरावर पोहोचलेले दुसरे न्यायमूर्ती आहेत.
Nagpur : देवाभाऊंच्या गृहनगरात पालकमंत्री आणि आमदार आणणार विकासाची वैनगंगा
उपराष्ट्रपती निवडणूक
उपराष्ट्रपती निवडणूक ही फक्त औपचारिक प्रक्रिया नसून लोकशाहीवरील विश्वास टिकवण्याची खरी कसोटी ठरणार आहे. काही विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करून निष्पक्षतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग हा संविधानिक स्वायत्त संस्था आहे. त्याने पारदर्शक, मुक्त आणि विश्वासार्ह निवडणूक पार पाडणे अपेक्षित आहे. अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोगावरील विश्वास डळमळीत झाला असल्याचे विरोधकांचे मत आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती निवडणूक ही देशाच्या लोकशाहीसाठी निर्णायक क्षण ठरणार आहे.
सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील संघर्ष, आगामी निवडणुकींवर होणारा परिणाम, तसेच आयोगाच्या स्वायत्ततेला लागणारे प्रश्न यामुळे देशातील राजकीय वातावरण अधिक तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीचे विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.
लोकशाहीच्या स्तंभांमध्ये संवाद
राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांची भेट ही भारतीय लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे संविधानिक सर्वोच्चतेचे प्रतीक आहेत, तर सरन्यायाधीश भूषण गवई न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकवण्याची जबाबदारी सांभाळतात. या दोन्ही पदांवरील व्यक्तींच्या कारकीर्दीने देशाच्या लोकशाहीच्या सुदृढतेला भक्कम आधार दिला आहे.
सोमवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या भेटीत सरन्यायाधीश गवई यांनी विविध राष्ट्रीय महत्त्वाचे विषय आणि संविधानिक प्रश्न चर्चेत आणले. त्यांच्या संवादाचे छायाचित्र सार्वजनिक झाले असून, चर्चेचा विषय बनले आहे. लोकशाहीच्या या दोन स्तंभांमधील विचारविनिमयाचे परिणाम आगामी राजकीय आणि सामाजिक निर्णयांवर स्पष्ट दिसणार आहेत.
