देश

Vice Presidential Election : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः उतरतील का रणभूमीवर?

Nana Patole : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एजन्सींचा दुरुपयोग

Post View : 56

Author

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सी.पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांनी बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

देशाच्या राजकारणात सध्या एकच खळबळ माजली आहे. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान जगदीश धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वातावरणात भूकंप आला होता. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. यात महाराष्ट्राचे राजकारणही चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असून, ही निवडणूक लवकरच दिल्लीत पार पडणार आहे. पण यातले खरे मसालेदार नाट्य आहे ते महाराष्ट्रात. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना मैदानात उतरवले आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनीही आपापली तलवार म्यानबाहेर काढली आहे. विशेषतः नागपुरातून या निवडणुकीचे वातावरण चांगलेच गरम झाले आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाजपने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. पण ही निवडणूक तर दिल्लीत होणार, मग फडणवीस यांना आतापासूनच दिल्लीला पाठवण्याची तयारी आहे की काय, असा खोचक सवाल पटोलेंनी उपस्थित केला.

Nitin Gadkari : आकाशातील सुख जमिनीवर उतरणार, बस होस्टेस भेटीस येणार

नागपूर ते दिल्ली चर्चा

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात टाकणे, सरकार पाडणे, हेच मोदी सरकारचे धोरण आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात न्यायालयाने अनेकदा फटकारले असले, तरी एजन्सीचा दुरुपयोग थांबत नसल्याचा दावाही त्यांनी केला. पटोलेंनी यापुढे जाऊन निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांच्या प्रकरणालाही हात घातला. संजय कुमार यांनी एक ट्विट डिलीट करून माफी मागितली. तरीही त्यांच्यावर नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. संजयकुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये रामटेक आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्येत मोठी घट झाल्याचा दावा केला होता.

रामटेकमध्ये लोकसभा निवडणुकीत 4 लाख 66 हजार 203 मतदार होते. तर विधानसभेत ही संख्या 2 लाख 86 हजार 931 इतकी घसरली. म्हणजेच तब्बल 38 टक्के मतदार कमी झाले. त्याचप्रमाणे, देवळालीत 4 लाख 56 हजार 72 वरून 2 लाख 88 हजार 141 मतदारांवर संख्या आली. म्हणजे 36 टक्के घट. या आकडेवारीवरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. पटोलेंनी यावरून निवडणूक आयोगालाही कोंडीत पकडले. संजय कुमार यांच्यावर चुकीच्या ट्विटसाठी गुन्हा दाखल होत असेल, तर निवडणूक आयोगानेही चुकीची माहिती ट्विट केली आहे. मग त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असा थेट हल्ला पटोलेंनी चढवला. त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावरही निशाणा साधला. आता ही निवडणूक आणि त्याच्याशी जोडलेली महाराष्ट्राची राजकीय नाट्य यामुळे दिल्लीपासून नागपूरपर्यंत सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.

Prashant Padole : हरित संकल्पासाठी खासदाराने गाठली दिल्ली

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!