महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : बजरंग दल आणि विहिंपला काहीच काम उरलं नाही

Atul Londhe : हिंदू-मुस्लिम वाद उकरून भाजप मूळ समस्या झाकतोय

Author

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदवर टीका करत निशाणा साधला आहे.

राज्यभरात तिथीनुसार 17 मार्च रोजी शिवजंयती साजरी केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची कबरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. छत्रपती संभाजी नगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. या विषयावर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या वादावर प्रतिक्रिया देत हिंदू संघटनांवर टीका केली.

महाराष्ट्रातील लोकांना त्यांना शांततेत जगू द्यायचे नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ते म्हणाले, बजरंग दल आणि विहिंपला राज्याच्या विकासाशी काही देणंघेणं नाही. औरंगजेबाने 27 वर्षे येथे राज्य केले, तरी तो महाराष्ट्राचे काही वाकडे करू शकला नाही, मग आता त्याची कबर हटवून काय साध्य होणार? काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनीदेखील भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना हा संपूर्ण मुद्दा खऱ्या समस्यांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी उभा केला जात असल्याचा आरोप केला आहे.

Babasaheb Mohanrao : फडणवीस चांगले, पण मुख्यमंत्री अजित पवार झाले पाहिजेत

धर्मवाद पसरतोय

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी वीज आणि पाण्यासाठी संघर्ष करत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, पण भाजप यावर बोलण्याऐवजी हिंदू-मुस्लिम वाद उकरत आहे, असे लोंढे म्हणाले. त्यांच्या मते, लोक यावेळी ऐतिहासिक विषयांच्या नादाला लागणार नाहीत आणि सरकारला खऱ्या समस्यांवर उत्तर द्यावे लागेल.

शनिवारी, बजरंग दलाचे नेते नितीन महाजन यांनी जाहीर इशारा दिला की, सरकारने जर औरंगजेबाची कबर हटवली नाही, तर बजरंग दल आणि विहिंप मोठे आंदोलन छेडतील. महाजन पुढे म्हणाले, संभाजींच्या खुनीच्या कबरीची पूजा केली जात आहे, आणि आम्ही हे कदापि सहन करणार नाही. बाबरी मशीद प्रकरण सर्वांना आठवत असेल. जर सरकारने कारवाई केली नाही, तर आम्ही स्वतः कबर हटवू. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ladki Bahin scheme : महायुतीच्या मंत्र्याने दिले आर्थिक भाराचे संकेत

सध्या या विषयावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. विहिंप आणि बजरंग दल आपली मागणी पक्की करत असून, काँग्रेस आणि विरोधक हा मुद्दा राजकीय नौटंकी असल्याचे म्हणत आहेत. सरकार या विषयावर कोणती भूमिका घेते आणि यावर पुढे काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!