महाराष्ट्र

काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांचा सरकारवर कडवट हल्ला

भाजप नेते Nitesh Rane यांच्यावर आरोप

Post View : 42

Author

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करत प्रचंड बहुमत मिळूनही अस्थिरतेचे आरोप केले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या शब्दांमध्ये, प्रचंड बहुमत मिळूनही असे अस्थिर सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं नाही, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर सवाल उठवत, राज्यात कंत्राटदारांची थकीबाकी, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे थांबलेले प्रकरण आणि वेगवेगळ्या योजनांच्या बड्या थकबाकीवरुन असंतोष व्यक्त केला. कंत्राटदारांचे पैसे मिळत नाही, शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही. सरकार फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात देत आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांनी सरकारला तिसऱ्यांदा इशारा दिला आहे. पीडब्ल्यूडी, इरिगेशन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागातील कंत्राटदारांची बरीच मोठी थकीबाकी आहे. वडेट्टीवार यांनी आरोप केला की, सरकारने तीन वेळा या कंत्राटदारांकडून इशारा घेतला आहे, मात्र त्यावर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जवळपास 89 कोटी रुपयांची थकीबाकी थकली आहे आणि कंत्राटदारांनी आता काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे, असे ते म्हणाले.

आदिवासी आरोग्य समस्यांवरून Devendra Fadnavis यांच्या कुलगुरूंना सूचना 

शेतकऱ्यांसाठी लांबलेले नुकसान भरपाई

वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा देखील उठवला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान सरकारने सहा महिन्यांपूर्वी नोंदवले असले तरी त्यासाठी भरपाई अजून दिली जात नाही, असे ते सांगतात. शेतकऱ्यांचे तसेच, अंगणवाडी सेविकांचे, जलजीवन मिशनचे आणि निराधार योजनांचे पैसे अजूनही थकीत आहेत, आणि यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे.

विजय वडेट्टीवारांनी बीडच्या जातीय रंगामुळे झालेल्या घटनेवर देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गुन्हेगाराला जात आणि धर्म यांचा काहीही संबंध नसावा. बीड प्रकरणाला जातीय रंग देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांच्या मते, सरकारने निष्पक्ष चौकशी करायला हवी आणि दोषी व्यक्तीवर कारवाई करायला हवी.

कोणाचाही Shaktipeeth Highway ला विरोध नाही

नितेश राणेंचे  धर्मांतर

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या धर्मांतर विरोधी कायद्याच्या मुद्द्यावर देखील टीका केली. नितेश राणेंनी संविधानाचे उल्लंघन करत धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची घोषणा केली आहे. जर त्यांना राज्यघटनेवर विश्वास असेल, तर त्यांनी असलेले वक्तव्य करू नये, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी वाघ नख महाराज आणि काळ्या जादू वर मिश्किल टोला लगावला. त्यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटले की, मुख्यमंत्र्यांचे काही मंत्री काळ्या जादूच्या विश्वासावर काम करत आहेत. हे सर्व मंतरलेले व्यक्ती असतील, त्यामुळेच त्यांना एकमेकांचे गुपित माहित असावे, असे ते म्हणाले.

विजय वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या सोयाबीन आणि धान खरेदीची थकीबाकी वरूनही सरकारवर गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. ओबीसी वसतिगृहातील मुलांच्या शिष्यवृत्तीचे पैसे देखील थकले आहेत, असे ते म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!