महाराष्ट्र

Congress : अपयशाची कबुली नाकारून अर्धवट व्हिडीओचे विणले जाळे

Political Drama : नितीन गडकरींची चिप खराब म्हणण्यामागे काँग्रेसचा कट

Post View : 65

Author

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला परावभाव अद्यापही काँग्रेसला पचलेला दिसत नाही. ज्यामुळे वारंवार विरोधकांकडून भाजपवर टीकेचे बाण सोडले जात आहे.

2024 हे वर्ष भारतीय राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट ठरलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने काही ठिकाणी आश्चर्यकारकरीत्या मतं गोळा करत सीट काबीज केल्या. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही सत्ता मिळेल, असा त्यांचा आत्मविश्वास डोंगराएवढा झाला. पण निकाल लागल्यानंतर महायुतीने काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवत त्यांना पुन्हा विरोधी बाकांवर पाठवले. मात्र पराभवाचा धक्का अजूनही पचवता न आल्याने काँग्रेस आता सोशल मीडियावरून सत्य नावाखाली अपूर्ण क्लिप्स आणि निवडक आरोपांच्या बॅटिंगवर उतरली आहे.

नुकतच 7 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर 40 लाख बनावट मतदार नावांचा गंभीर आरोप केला. याच मोहिमेत काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना मुलाखतीतील व्हिडीओ समोर आणत नवा वाद पेटवला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्र विधानसभा प्रचारादरम्यान गडकरींनी दिलेल्या मुलाखतीचा होता. यात त्यांनी सांगितले की, त्यांच्या लोकसभा मतदारसंघात तब्बल साडेतीन लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. ज्यात त्यांच्या कुटुंबातील लोकांचाही समावेश होता. एवढा भाग दाखवून काँग्रेसने सोशल मीडियावर टाळ्यांचा गजर केला, पण त्यामागचे खरे सत्य गुप्त ठेवले.

Devendra Fadnavis : सावत्र भावांचे डाव ‘लाडकी’नेच लावले उधळून

सोशल मीडियावर खोटेपणा

संपूर्ण व्हिडीओ पाहिला तर स्पष्ट होते की नितीन गडकरी कुणावर थेट आरोप करत नाहीत. उलट ते काँग्रेस आणि विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराची पोलखोल करत आहेत. नागपुरातील दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजात संविधान बदलले जाणार आहे, असा खोटा भीतीदायक संदेश काँग्रेसने पसरवल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. भाजपकडे संविधान बदलण्याची कोणतेही धोरण नाही हेही त्यांनी ठामपणे मांडले. गडकरींच्या म्हणण्यानुसार, खोट्या भीतीच्या वातावरणाचा लोकसभा निवडणुकीवर विपरीत परिणाम झाला. पण विधानसभा निकालानंतर लोकांना सत्य कळलं आणि काँग्रेसचा अपप्रचार फसला.

अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता व्हिडीओ कापून गडकरींनी भाजपच्या अपयशाची कबुली दिली असा खोटा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.पण हा डाव सोशल मीडियावर फार वेळ टिकला नाही. कारण पूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर कळाले गडकरींचे विधान काँग्रेसलाच टोला आहे. काँग्रेसने उचललेला मुद्दा म्हणजे अपूर्ण सत्याचा खेळ, जो त्यांच्या प्रचाराची खासियत बनला आहे.काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ हा फक्त अपूर्ण सत्य दाखवणारा होता. वास्तविकता अशी होती की गडकरींचा मुद्दा काँग्रेसच्या प्रचारातील विकृतींवर होता, निवडणूक आयोगावरील आरोपांवर नाही.

Prataprao Jadhav : काकांनी फिरविले चक्र; वंदे भारतचा शेगावला थांबा

राजकीय मैदानात क्लिप कटिंग ही नवी गोष्ट नाही. पण या प्रकरणात काँग्रेसने गडकरींचा व्हिडीओ शस्त्र म्हणून वापरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. महाराष्ट्राचे राजकारण निवडणुकीनंतरही थंड होण्याचं नाव घेत नाही. अशा अर्धसत्यच्या लढाया आता नव्या उंचीवर पोहोचल्या आहेत.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!