महाराष्ट्र

Nagpur : लोकशाहीसाठी देवाभाऊंच्या गृहनगरात काँग्रेस उतरणार रस्त्यावर

Shyamkumar Barve : तीन सप्टेंबरला कामठी विधानसभेत दणका

Post View : 51

Author

काँग्रेसने मत चोरीच्या आरोपावरून महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 3 सप्टेंबर कामठी विधानसभेत मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभर आंदोलन होणार आहे.

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रस्त्यावर गणपती बाप्पांचे स्वागत होत असताना, राजकीय वातावरणातही एक वेगळाच रंग चढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात 2024 विधानसभा निवडणुकीतील मत चोरीच्या आरोपांनी खळबळ माजवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट मतचोरीचा आरोप करत राजकीय वर्तुळात आग पेटवली आहे. या आरोपांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उफाळली असून, हा मुद्दा आता थेट दिल्लीच्या केंद्रीय पातळीवर पोहोचला आहे. राहुल गांधी यांनी देशभरात मत चोरीविरोधी बाइक रॅली काढत हा मुद्दा तीव्रपणे मांडला आहे.

आता महाराष्ट्रातही काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाचा बिगुल वाजवला आहे. या आंदोलनाची ठिणगी नागपूर पासून पेटणार आहे. काँग्रेसने निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतदान यादीतील अनियमिततेचा गंभीर आरोप केला आहे. येत्या 3 सप्टेंबर रोजी नागपूरच्या कामठी विधानसभेत काँग्रेस मोठे आंदोलन करणार असून, यात पक्षाचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या आंदोलनातून काँग्रेस मतचोरीच्या मुद्द्यावर जनजागृती करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये शनिवारी (३० ऑगस्ट रोजी) आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार श्याम बर्वे यांनी या आंदोलनाची माहिती दिली.

Ravikant Tupkar : ‘दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई’ मलकापूरात पेटली

भाजपचा पलटवार सुरू

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. बर्वे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असून, मतदान यादीत अनियमितता आणि मतचोरीच्या घटनांनी लोकशाहीच्या मूळ गाभ्यालाच धक्का लावला आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या गैरप्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपने काँग्रेसच्या या आरोपांना खोटे ठरवत पलटवार केला आहे. काँग्रेसला निवडणुकीतील पराभव पचवता येत नसल्याचा टोला भाजपने लगावला आहे.

निवडणूक आयोगानेही आपली भूमिका स्पष्ट करत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असल्याचा दावा केला आहे. मात्र, काँग्रेस या मुद्द्यावर मागे हटायला तयार नाही. पक्षाने देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात आंदोलनाची रणनीती आखली आहे. कामठीतील आंदोलन हा त्याचाच एक भाग आहे. जिथे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात राजकीय रंग मिसळत असताना, काँग्रेसच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतचोरीच्या आरोपांवरून सुरू झालेली ही लढाई आता रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षावर दबाव वाढेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नागपूरपासून सुरू होणारी ही आंदोलनाची चिंगारी संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

IPS Archit Chandak : बाप्पाच्या उत्सवात ‘प्रहार’ने केले गोवंश तस्करांचे ‘विसर्जन’

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!