महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : महापालिका निवडणूक लांबल्यास आंदोलनाची तयारी

Congress : सत्तेचं केंद्रीकरण भाजपला हवंय

Post View : 16

Author

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महापालिका निवडणूक लांबणीवर टाकल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

राज्यातील महापालिका निवडणूक सतत लांबणीवर आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक झालेल्या नाही. यावर आता विरोधक आक्रमक पवित्रा घेतांना दिसत आहेत. काँग्रेसने आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राज्यप्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्यावर महायुती सरकारवर जोरदार टीका करताना भाजपवर सत्तेचे विकेंद्रीकरण टाळण्याचा आरोप केला आहे. भाजपला सत्तेचे केंद्रीकरण हवे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम झाल्या तर त्यांना धोका वाटतो, म्हणूनच ते निवडणुक घेत नाहीत, असे सपकाळ म्हणाले.

सपकाळ यांनी हा मुद्दा केवळ राजकीय नसून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा प्रश्न असल्याचे सांगितले. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने लोकांचे लक्ष खऱ्या समस्यांवरून हटवण्यासाठी औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा उचलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सपकाळ म्हणाले, आरएसएसच्या भारताच्या संकल्पनेत विविधतेला स्थान नाही. त्यांच्या दृष्टीने जे बसत नाही, ते ते नष्ट करायचे ठरवतात. यामागे लोकांच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा डाव आहे. यासोबतच, त्यांनी राज्यातील दोन ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधले.

Nagpur : उपराजधानीत झोनचा आर्थिक बूस्टर डोस

समस्यांकडे दुर्लक्ष

सपकाळ यांनी महायुती सरकारवर विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा आरोप केला. सरकार संसदीय लोकशाहीपेक्षा बुलडोझर राजकारणावर विश्वास ठेवते. आम्ही मांडणाऱ्या समस्यांकडे ते दुर्लक्ष करतात. विरोधी पक्षाची भूमिका पायदळी तुडवली जात आहे. अशा परिस्थितीत लोकांचा पाठिंबा मिळवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यपालांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. संविधानिक प्रक्रियेचा अवमान करणाऱ्या आणि अनधिकृतपणे सकाळी लवकर सरकार स्थापनेस मदत करणाऱ्या राज्यपालांबद्दल आपण न बोललेलेच बरे, असे ते म्हणाले.

दुसरीकडे भाजपने यंदाच्या महापालिका निवडणूकसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणूकसाठी भाजपने नवीन खेळी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या विधानसभा निवडणूक मध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची कमतरता दिसून येत आहे. मात्र, पक्षाने सपकाळ यांच्यावर विश्वास ठेवत राज्याचा कार्यभार सोपवला आहे. पुढील पाच वर्षांत भाजपविरोधात वैचारिक लढा देऊन काँग्रेसला पुन्हा उभे करण्याचा त्यांचा निर्धार आहे. आता पाहावे लागेल की काँग्रेसचे हे आंदोलन किती प्रभावी ठरते. राज्यातील राजकीय समीकरणे यामुळे बदलतात का.

BJP Vs Congress : वडेट्टीवारांनी टोचली अन् बावनकुळेंनी खेचली 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!