महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : स्वातंत्र्य दिनी जालन्यात पोलिसांची माजोरडी मॅजिक

Political Drama : लोकशाहीत आंदोलन करणाऱ्याला लाथ मारणे अयोग्य

Post View : 38

Author

जालन्यात 15 ऑगस्टला पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला पोलिस उपाध्यक्षाने फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना जालन्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. दरवर्षीप्रमाणे राज्यातील प्रत्येक पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात ध्वजारोहण कार्यक्रमात भाग घेत असतात. यावेळी जालना जिल्ह्यात सत्ताधारी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मात्र, त्यादरम्यान एक अप्रत्याशित आणि वादग्रस्त घटना घडली. ज्यामुळे परिसरात आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमठल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी एका कुटुंबाने जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावर पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांना तात्काळ अडवले. यानंतर, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी या आंदोलकाला अगदी फिल्मी स्टाईलमध्ये मागून लाथ मारल्याचा व्हिडीओ समोर आला. या घटनाचे पडसाद त्वरित सोशल मीडियावर उमठले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोलिसांचे अनावश्यक हिंसक वर्तन पाहून लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. ही घटना तिथे थांबली नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटले, फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाला लाथ मारणे पोलिसांना शोभते का? यावर कोणतीही कारवाई होईल का? वडेट्टीवार यांच्या आरोपानुसार, पोलिसांनी पालकमंत्र्यांसमोर चमकोगिरी करण्याच्या उद्देशाने आंदोलकांना अशा प्रकारे वागवले.

Nagpur : तुरुंगातून सुटलेला कैदी न्यायालयात गांजा तस्कर

सामान्य जनतेची चिंता

वडेट्टीवार यांचा आरोप आहे की, एक्स्ट्रा कामगिरी करणाऱ्या पोलिसांनी लोकशाहीच्या अधिकारांचा उल्लंघन केला आणि सामान्य माणसाला अपमानित केले. यावेळी, विजय वडेट्टीवार यांनी लोकशाहीच्या अधिकाराचा मुद्दा समोर आणत, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र, जो तुम्हाला आवडत नाही, त्याला लाथ मारणे चूक आहे. असा निषेध व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पोलिसांनी या प्रकारे वागणे खाकी वर्दीचा अपमान आहे. विजय वडेट्टीवार यांनी यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आणि मागणी केली की, या पोलिसाच्या वर्तणुकीवर त्वरित कारवाई केली जावी. पोलिसांना सामान्य जनतेला लाथ मारण्याची हिंमत कशी येते? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

अशा प्रकारचे वर्तन राज्यातील पोलिस दलाच्या माजोरडी वृत्तीला दर्शवित असल्याचा आरोप त्यांनी केला. जालन्यातील या घटनेनंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. जरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी, पोलिसांच्या हिंसक वर्तनाने मात्र अनेकांनी त्यावर तीव्र निषेध केला आहे. अनेक नागरिकांना या घटनेनंतर पोलिसांच्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जालना येथील पोलिस उपाधीक्षकांचा व्हिडीओ हा राज्यात असलेल्या पोलिसांच्या अनियंत्रित वागणुकीचे एक उदाहरण ठरू शकतो. जालना येथे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्याला लाथ मारली, पण अंधाऱ्या कोठडीत अनेकांना मारहाण केली गेली आहे, त्यावर चर्चा कधी होईल? असा प्रश्न आता नागरिक आणि विरोधक विचारत आहेत.

Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदारांचा प्रहार

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण् यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात द लोकहित लाइव्हपासून केली. त्यांना ऑनलाइन मीडिया आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!