महाराष्ट्र

Jaykumar Gore : जोपर्यंत देवाभाऊ पाठीशी, माझं कुणी वाकडं करू शकत नाही

Maharashtra : अश्लील फोटो प्रकरणात जयकुमार गोरे संतापले

Author

भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो प्रकरणामुळे जोरदार टीका होत आहे. मात्र, त्यांनी एका सभेत विरोधकांना सडेतोड उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लील फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. मात्र, माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे झालेल्या भाजप शाखा उद्घाटन सोहळ्यात जयकुमार गोरे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपले मत मांडले आणि विरोधकांना ठणकावून उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोरे यांच्या विरोधात विविध आरोपांच्या फैरी झडत आहेत. पण आपल्या बिनधास्त आणि ठाम शैलीसाठी ओळखले जाणारे जयकुमार गोरे यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत, आपल्यावर होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझ्याविरोधात प्रकरणे दाखल झाली आहेत. मला रोखण्यासाठी काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीकिनारी पूजा करतात, काळ्या बाहुल्या बांधतात. पण जोपर्यंत माता-भगिनी आणि जनतेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत माझे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही,’ असे खणखणीत वक्तव्य करत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.

Nagpur Curfew : दुपारी तीननंतर उपराजधानीत संचारबंदी संपुष्टात

विरोधकांना इशारा

गोरे यांनी आपल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. ‘जोपर्यंत माता-भगिनी आणि जनता माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत कोणीही काहीही करू शकत नाही,’ असे सांगत त्यांनी आपल्या समर्थकांमध्ये आत्मविश्वास जागवला. जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांना इशारा देताना, ‘माझ्या पाठीशी जोपर्यंत देवाभाऊ उभा आहे, तोपर्यंत कोणीही मला नामोहरम करू शकत नाही. कितीही काळ्या बाहुल्या बांधा, पूजा करा, मला काही फरक पडत नाही,” असे ठणकावून सांगितले. ‘माझ्या प्रत्येक निवडणुकीत मला कुठल्या ना कुठल्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होतो. पण मी खंबीर राहिलो, कारण माझ्या पाठीशी देवाभाऊ आणि जनता आहे,’ असे ते म्हणाले.

कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी आपल्या यशावर टीका करणाऱ्या विरोधकांवरही जोरदार शब्दांत निशाणा साधला. ‘एका साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झालंय, हे काही लोकांना बघवत नाही. निवडणुका आल्या की, माझ्यावर आरोप होतात. मला अडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण मी त्यांना कधीच दाद दिली नाही,’ असे ते म्हणाले.

Sanjay Raut : हिंदुत्त्ववाद्यांना तैमूर चालतो, पण औरंगजेबाची कबर नको

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!