नागपूर-पुणे महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार तयारीत असताना, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अजूनही कोणतीही सक्रियता दिसत नाही.
महाराष्ट्रात सध्या राजकीय रंगमंचावर भाऊ आणि दादा यांचाच बोलबाला दिसतोय. नागपूरच्या गल्लीपासून पुण्याच्या वाहतूक कोंडीपर्यंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपापल्या बालेकिल्ल्यात निवडणुकीची तयारी जोरात सुरू केलीय. पण, एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना गट मात्र शांतच. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. आता महापालिका निवडणुकीसाठी महायुती सरकार कंबर कसत आहे. पण या सगळ्या धामधुमीत शिंदेसेना कुठे गायब आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. नागपूरात देवेंद्र फडणवीस, म्हणजेच ‘देवा भाऊ’, आपल्या गृहनगरात विकासाची गंगा आणत आहेत.
दुसरीकडे, पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे देखील आपल्या पुणेरी गडात सकाळी पावणेसहा वाजतापासून पाहणी करायला सज्ज झालेत. पण शिंदे साहेबांचा गट मात्र ‘स्लो मोशन’ मोडमध्ये आहे. निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो, पण शिंदेसेनेकडून कोणतीच हालचाल दिसत नाही. ‘साहेब, कुठे आहात?’ असा सवाल आता कार्यकर्त्यांपासून ते जनतेपर्यंत गाजतोय. पुण्यात अजितदादांनी नुकताच चाकण चौकाचा पहाटेचा दौरा केला. पहाटे पावणेसहाचा त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सकाळी पावणेसहाला दादांनी पाहणी केली आणि वाहतूक कोंडीवरून पोलिसांना चांगलेच सुनावले. दादा म्हणाले, एका गाडीने थांबह घेतला, की रांगा लागतात. पीक टाईमला तर विचारायलाच नको.
Chandrashekhar Bawankule : रेतीच्या वाळवंटात कायद्याचा गडगडाट
राजकीय रणभूमीची तयारी
अजित पवार यांनी यावरून पुण्यात नव्या तीन महानगरपालिकांची गरज बोलून दाखवली. चाकण, हिंजवडी, आणि वाकवस्ती-लोणी काळभोर परिसरात महानगरपालिका स्थापन करून रस्ते, ड्रेनेज आणि वर्ल्ड बँकेचा निधी आणण्याचा दादांचा मास्टरप्लॅन आहे. काहींना आवडेल, काहींना नाही, पण काळानुसार निर्णय घ्यावे लागतात, असं दादांनी ठणकावून सांगितले. पुण्यात विकासाची गाडी आता दादांच्या हाती आहे. ती वेगात धावताना दिसतेय. नागपूरातही कमी रस्सीखेच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गडात विकासाची लाट आणलीय. नुकतंच 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले.
रस्त्यांपासून ते लोकांच्या समस्यांपर्यंत, भाऊंनी सगळ्यावर लक्ष ठेवलंय. पक्षात नव्या कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू आहे. नागपूरात भाजपची मोर्चेबांधणीही जोरात सुरू आहे. नागपूर हा आमचा गड आहे. तो अभेद्य ठेवायचाय, असा दृढनिश्चय भाऊंच्या प्रत्येक कृतीत दिसतोय. महायुती सरकारने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली, तरी शिंदे सेनेची शांतता चर्चेचा विषय ठरतेय. भाऊ आणि दादा जोमाने तयारी करत असताना, शिंदे साहेबांचा गट मात्र ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसतोय. कार्यकर्त्यांमध्येही याबाबत कुजबुज सुरू आहे. साहेब काय खेळ खेळताहेत? असा सवाल सोशल मीडियावर फिरतोय. निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. अशा वेळी शिंदेसेनेची ही ‘स्लो चाल’ त्यांना महागात पडेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Congress : अपयशाची कबुली नाकारून अर्धवट व्हिडीओचे विणले जाळे
महाराष्ट्रात निवडणुकीचा रंग चढलाय. भाऊ-दादांचा जलवा तर सगळीकडे गाजतोय. पण शिंदे साहेबांचा गट कधी ‘ॲक्शन मोड’मध्ये येणार? पुण्यात दादांचा दबदबा, नागपूरात भाऊंचा बोलबाला, पण शिंदेसेना काय खेळ खेळणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत कोण बाजी मारणार. कोणाचा ‘दिल’ जिंकणार? हा खेळ पाहण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.
Devendra Fadnavis : सावत्र भावांचे डाव ‘लाडकी’नेच लावले उधळून