देश

Political Drama : महाराष्ट्र ते कर्नाटक, मतदान घोटाळ्याने डगमगला लोकशाहीचा पाया

Yashomati Thakur : भाजप-आयोगच्या संगनमताने देशाचे हित धोक्यात

Post View : 23

Author

महाराष्ट्रातील मतचोरीचा वाद अद्यापही थांबलेला दिसत नाही. महाराष्ट्रातून सुरू झालेला मजुरीचा वाद आता थेट कर्नाटकात जाऊन ठेपला आहे. काँग्रेसने यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील निवडणूक गोंधळाने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदार यादीतील घोटाळ्यांचा तमाशा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो कर्नाटकच्या आलंद मतदारसंघापर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोग हा खरोखरच स्वायत्त आहे की सत्ताधारी भाजपचा ‘बॅक ऑफिस’ बनला आहे? असा सणसणीत सवाल काँग्रेस करत आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने मतदार फसवणुकीशी संबंधित माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. जणू काही खरे गुन्हेगार लपवण्याचा डाव आखला जातोय.  मे 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी आलंद मतदारसंघातून हजारो मतदारांची नावे गायब झाली होती.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना निवडणूक आयोगाने सुरुवातीला काही कागदपत्रे पुरवली. पण आता महत्त्वाचे पुरावे देण्यास नकार दिला आहे. यामुळे संशयाचा धूर अधिकच पसरला आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावर चांगलाच राग व्यक्त केला आहे. त्यांनी थेट निवडणूक आयोगावर हल्ला चढवत म्हटले, हा प्रकार केवळ संशयास्पद नाही, तर लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे.  यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, निवडणूक आयोगाने CID तपासासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली आहे. ज्यामुळे खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे.

Chandrashekhar Bawankule : मेघा इंजिनिअरिंग प्रकरणाने राजकीय आखाडा पेटला

राहुल गांधींचा पुरावा

निवडणूक आयोगाचे दस्तऐवज हे देशातील प्रत्येक निवडणुकीचे मूळ आधारस्तंभ आहेत. त्यांना लपवणे म्हणजे थेट घटनात्मक कर्तव्याचा भंग आहे, असे ठाकूर यांनी ठणकावले. त्या पुढे म्हणाल्या, आयोगाने पारदर्शकपणे काम करणे अपेक्षित आहे. पण सध्या ते सत्ताधारी भाजपचे प्यादे बनलेले दिसत आहेत. हा लोकशाहीचा खून आहे. यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणाला आणखी धार देण्यासाठी राहुल गांधी यांच्या 7 ऑगस्टच्या सादरीकरणाचा दाखला दिला. राहुल गांधी यांनी तब्बल 1 तास 11 मिनिटांचे 22 पानांचे सादरीकरण करत कर्नाटकच्या मतदार यादीतील गडबडी उघडकीस आणली होती. महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांनी आमचा संशय खरा ठरला.

निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मतदारांची खुलेआम फसवणूक केली आहे, असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यशोमती ठाकूर यांनी याला पाठिंबा देत म्हटले, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच SIR माहिती लपवल्याबद्दल आयोगाला फटकारले आहे, तरीही ते सत्य दडपण्यात मग्न आहेत. मे 2023 निवडणुकीपूर्वी आलंद मतदारसंघात तपास यंत्रणांनी तब्बल 5 हजार 994 बनावट अर्ज पकडले होते. ही नावे मतदार यादीतून हटवण्याचा डाव होता, असा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेस सरकारने याची CID चौकशी सुरू केली. पण आता निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली पुरावे देण्यास टाळाटाळ करत आहे. यशोमती ठाकूर यांनी यावर संताप व्यक्त करत म्हटले, हा प्रश्न फक्त विरोधकांचा नाही, तर संपूर्ण जनतेचा आहे. मतदारांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या या कारभाराला निवडणूक आयोगाला उत्तर द्यावेच लागेल.

IPS Archit Chandak : बलात्काराच्या राक्षसाला खाकीच्या तावडीत आणणार

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!