महाराष्ट्र

Parinay Fuke : ओबीसींसाठीची शिष्टाई ठरली यशस्वी

OBC Reservation : मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक ठरली यशस्वी

Author

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं जीआर काढला आहे. सरकारच्या या जीआरवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळुन निघालं. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. हे आरक्षण देताना त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात येऊ नये, अशी मागणी आता आणखी आक्रमक झाली आहे. आरक्षणाच्या या मुद्द्यावर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार बैठकीला उपस्थित होते. याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. ओबीसी समाजातील विविध संघटनांचे 40 प्रतिनिधी देखील बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली.

IPS Archit Chandak : आधी घोषणांनी दिला प्रतिसाद, आता बॅनरने दिला गौरव

बबनरावांचा पाठिंबा

ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघानं घेतलेली भूमिका राष्ट्रव्यापी आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्यावर विश्वास दाखवला आहे. ओबीसींचे प्रश्न निकाली काढण्यासाठी यापूर्वी देखील आमदार डॉ. फुके यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना सर्वांना याचा प्रत्यय आला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मदतीनं डॉ. फुके यांनी ओबीसींचे प्रश्न सोडविले.

वसतिगृहांचा प्रश्न मार्गी लागला. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबाबतही सरकारी यंत्रणेने वेगवान पद्धतीनं काम करायला सुरुवात केली. त्यामुळं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा डॉ. फुके यांच्यावरील विश्वास आणखी वाढत गेला. ओबीसी समाजाचे असल्यामुळं डॉ. फुके यांनी आपल्या ज्ञाती बांधवांसाठी प्रयत्न आजही कायम ठेवले आहेत. त्यामुळंच मंत्रिमंडळात डॉ. फुके यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली.

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा जीव गेला तरी सत्ता सुखात झोपते

डॉ. फुके यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा केला. डॉ. परिणय फुके हेच मुख्यमंत्री असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं. डॉ. फुके यांनी एखाद्या मुद्द्यावर शब्द टाकायचा अन् मुख्यमंत्र्यांनी तो पूर्ण करायचा हे सगळ्यांनीच अनुभवले आहे. सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुद्द्याचे काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं. यानंतर असे अनेक प्रश्न निकाली निघत असल्याचे दिसले. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबतही डॉ. फुके यांचे प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरतील असं त्यामुळं सांगितलं जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!