प्रशासन

Nagpur Police : ‘DCP चमको’ने पत्रकारामार्फत विचारले काय हवे?

Post View : 77

Author

पोलिस दलात प्रसिद्धीच्या मागे असलेल्या मिटस्ट डीसीपी चमको यांनी ‘द लोकहित लाइव्ह’ला एका पत्रकारामार्फत नेमकं काय हवं ते विचारलं.

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यापेक्षाही आपण सुपर कॉप आहोत. शहरातीच बाकीचे डीसीपी पोट्टेसोट्टे आहेत. आपण सिनीअर आहोत. त्यामुळं आपणच काम करतोय, हे भासविण्याचा प्रयत्न केल आयपीएस झालेले डीसीपी गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. ‘द लोकहित लाइव्ह’ने त्यांना जबर दणका दिल्यानंतर त्यांनी तातडीने स्वत:ची चमकोगिरी बंद केली आहे. रोज एकच एक कामांचे फोटो टाकणाऱ्या या डीसीपी साहेबांनी 15 नोव्हेंबरपासून नागपूर पोलिस दलाच्या मीडिया ग्रुपमध्ये आपली चमकोगिरी बंद केल्याचे दिसत आहे.

चमकोगिरी बंद केल्यानंतर मात्र त्यांनी नागपुरातील एका युवा पत्रकारामार्फत ‘द लोकहित लाइव्ह’कडे नेमके काय पाहिजे, याची विचारणा केली. आता या मिस्टर चमको डीसीपी यांच्याकडून ही ऑफर होती की पत्रकाराने स्वत:च पुढाकार घेतला हे नेमके सांगता येणार नाही. परंतु ‘द लोकहित लाइव्ह’शी संपर्क साधल्यानंतर या पत्रकाराने जणू आपल्याला माहितीच नाही संबंधित डीसीपी कोण, हे भासविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कळले की संबंधित पत्रकार डीसीपी साहेबांच्या जवळचे आहेत. नेमके काय हवे, याची विचारणा झाल्यानंतर त्याचे उत्तर ‘द लोकहित लाइव्ह’ने त्याचे सविस्तर उत्तर नागपूरचे सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना फोनवर संपर्क साधत दिले आहे.

IPS Transfer : राज्य पोलिस दलात लवकरच फेरबदल

खरोखर कामं करा

नागपुरातील एका महिलेचे एआयच्या मदतीने अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले होते. अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या ही महिला हे व्हिडीओ पाहिल्यांनतर हादरली होती. तिच्या कुटुंबातील प्रत्येक महिलेचे असे व्हिडीओ तयार करण्यात आले होते. या महिलेला सायबर सेलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तिला उलट सल्ला दिला. एफआयआर करू नका. तुमच्याच बातम्या मीडियात येतील, असा सल्ला दिला दिला. तिला तीन वेळा परत पाठवले. तुम्ही एफआयआर केली तरी आरोपी सापडणार नाही. उलट तुमचे व्हिडीओ एखाद्या पॉर्नसाइटवर येतील असेही या महिलेला सांगण्यात आले.

‘द लोकहित लाइव्ह’ने हा प्रकार संबंधित डीसीपी यांच्या निदर्शनास आणून दिला होता. परंतु ज्या साहेबांचे सोशल मीडियावर ‘प्रेम’ आहे. त्यांनी या प्रकरणी पीडित महिलेला कोणतीही मदत केली नाही. वारंवार सांगूनही काहीच झाले नाही. अखेर त्या महिलेने आपल्या संपूर्ण परिवारातील सदस्यांचे मोबाइल क्रमांक बदलले. इंदौरमध्ये असताना सोशल मीडियातून झालेली ओळखी कशी आयुष्यभरासाठी ‘गळ्यातील मंगळसूत्र’ बनते हे या डीसीपी साहेबांनी जवळून पाहिले आहे. परंतु तरीही त्यांनी अश्लील प्रकरणातील महिलेला मदत केली नाही.

IPS Transfer : कर्तबगार एसपींच्या बदलीची चर्चा आलीच कुठुन?

कामाकडे दुर्लक्ष

त्यानंतर या मिस्टर चमको डीसीपी साहेबांना आणखी एक जबाबदारी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी विश्वासाने दिली. बदलीसाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करीत या डीसीपी साहेबांनी नागपूर शहरात पोस्टिंग मिळवून घेतली होती. आले तेव्हापासून त्यांना हिच पोस्टिंग हवी होती. आपल्या पोस्टिंगसाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळावा, म्हणून हे चमको डीसीपी जीवाचा आटापिटा करीत होते. अखेर त्यांना दोन पदांचा कार्यभार मिळाला. त्यानंतरही ‘द लोकहित लाइव्ह’ने त्यांना बरेच इनपुट दिले.

त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अनेक वाहनांना नंबर प्लेटच नाही, हे ‘द लोकहित लाइव्ह’ने लक्षात आणून दिले. मुलींचे छेड काढल्यानंतर तुकडोजी पुतळा चौकातून तीन युवत एका बाइकवर पळाले होत. ही युवती जेमतेम 16 वर्षांची होती. मात्र वेळ आणि वाहन क्रमांक कळविल्यानंतरही या डीसीपी साहेबांनी काहीच केले नाही. उलट अजनी आणि बेलतरोडी पोलिसांनी याप्रकरणी महत्वाची कामगिरी केली. त्यानंतर या साहेबांच्या चमकोगिरीमुळे सुटणारी अनेक वाहने ‘चेन स्नॅचिंग’मध्ये पकडली गेली. हे सगळे मुद्दे ‘द लोकहित लाइव्ह’ने त्यांच्या सन्मानपूर्वक लक्षात आणून दिले. मात्र चमको डीसीपी साहेबांनी ‘Do What you like’ असा उद्धट मेसेज ‘द लोकहित लाइव्ह’कडे पाठविला.

Akola Police : अर्चित चांडक यांच्यामुळे ताज्या झाल्या चार दशक जुन्या स्मृती

अखेरपर्यंत पाठपुरावा

या डीसीपींच्या वर्तणुकीबद्दल ‘द लोकहित लाइव्ह’ने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टेक्सट एसएमएस करीत माहिती दिली. रात्री दीड वाजता बावनकुळे यांनी स्वत: ‘द लोकहित लाइव्ह’शी संपर्क साधत सर्व मुद्दे समजून घेतले. नागपुरातील सर्व डीसीपी प्रत्येक मेसेजला रिप्लाय देतात. अनेकदा संपर्क केल्यावर स्वत: सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी योग्य ती दखल घेऊन कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी कधीकधी कामातील व्यस्ततेमुळे फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर रिप्लाय दिला नाही, तरी त्यांना मिळालेल्या माहितीची दखल त्यांनी घेतली आहे. मात्र हे चमको डीसीपी केवळ ‘चीप पब्लिसिटी’च्या मागे आहेत.

चमको डीसीपी साहेबांना ‘Do What you like’ असा मेसेज ‘द लोकहित लाइव्ह’ला दिला आहे. त्यामुळं आता जोपर्यंत मिस्टर चमको डीसीपी पूर्णपणे माणसात येत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणाचा सबळ पुराव्यांच्या आधारावर पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून मुंबईत झालेली बदली चमको डीसीपी यांनी कशी फिरवली हे आता ‘द लोकहित लाइव्ह’ पुढे आणणार आहे. एक घर खाली करून घेण्याचा ठेका या चमको डीसीपी साहेबांनी घेतला होता. या प्रकरणात एका महिलेचे शोषण झाले आहे, या प्रकरणाचे सबळ पुरावे ‘द लोकहित लाइव्ह’च्या हाती आले आहेत. त्यामुळे पैशांच्या जोरावर पोस्टिंग मिळविणाऱ्या या अधिकाऱ्याला वठणीवर आणण्याचा विडा आता ‘द लोकहित लाइव्ह’ने उचलला आहे.

Delhi Blast : अकोला पोलिसांकडून युवकाची आठ तास चौकशी

रेड्डींसोबत संवाद

पत्रकारामार्फत काय हवे, हे मिस्टर चमको डीसीपी साहेबांनी ‘द लोकहत लाइव्ह’ला विचारले आहे. त्यामुळे नेमके काय पाहिजे हे ‘द लोकहित लाइव्ह’ने सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी 15 नोव्हेंबर रोजी संपर्क साधत स्पष्ट केले आहे. पोलिस आणि पत्रकार हे जनतेचे सेवक आहे. फरक इतकाच आहे की पोलिस वर्दीतील जनसेवक आहेत आणि पत्रकार विनावर्दीचे. आजपर्यंत ‘द लोकहित लाइव्ह’कडून कोणत्याही व्यक्तीगत कामासाठी कधीही कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही. जनतेची कामं करणाऱ्या अधिकाऱ्यांना, आमदार, खासदारांना आणि लोकप्रतिनिधींच्या कार्याची ‘द लोकहित लाइव्ह’ नेहमीच कोणत्याही अपेक्षा न ठेवता योग्य ती दखल घेते.

नागपुरातील सर्व डीसीपी, एसीपी आणि स्वत: सहपोलिस आयुक्त देखील याचे साक्षीदार आहेत. परंतु लोकांची कामं न करता केवळ चमकोगिरी करणाऱ्या आणि बाईलवेड्यांना सरळ करण्याचे कामही जबाबदार प्रसार माध्यम म्हणून करण्याचे आपले कर्तव्य ‘द लोकहित लाइव्ह’ पूर्ण करेल यात कोणतीही शंका नाही. ‘द लोकहित लाइव्ह’ कधीही कोणताही ठोस पुरावा हाती असल्याशिवाय कोणतेही वृत्त प्रकाशित करीत नाही.

वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याच्या परिणामांचा विचार करीत नाही आणि घाबरतही नाही. त्यामुळं मिस्टर चमको डीसीपी एक समजून घ्या, तुम्ही जनतेची कामं प्रामाणिकपणे करा. जनता आणि मीडिया तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. जनतेची कामं करणार नसाल तर जनता माफ करणार नाही. पोस्टिंगसाठी आपल्याच आयपीएस कॅडरच्या अधिकाऱ्यांचा गेम करणार असाल तर कदाचित अधिकारी माफ करतीलही पण ‘Do What you like’ हा जर तुमचा तोरा असेल तर ‘लाइक’ आणि ‘शेअर’च्या बाबतीत प्रसार माध्यमं सगळ्यात पुढे आहात हे विसरू नका. अनेक पीडितांचे तुम्ही आतापर्यंत शोषण केले आहे. अंगावर वर्दी आहे म्हणून ‘गेम’ करता येतो, या भ्रमात राहू नका. सगळे एकत्र आले तर तुमचं काही खरं नाही, कारण ‘गेम कभी भी हो सकता है.’

Shiv Sena : एकच काम पण दोनदा घेतला दाम

‘लोकहित’चे आभार

मिस्टर चमको डीसीपी यांच्याबद्दल ‘द लोकहित लाइव्ह’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांचे ‘व्हॉटसअॅप कॉल’ येऊन गेले. त्यातील काही चमको डीसीपी यांचे ‘बॅचमेट’ होते. काही ज्युनीअर होते तर अनेक सिनीअर होते. त्यांनी चमको डीसीपी यांचे अनेक प्रकरणं सांगितली. त्याचे पुरावेही दिले. त्यामुळे डीसीपी साहेब सिंघम चित्रपटातील त्या बाबाचा डॉयलॉग पुन्हा आठवा. ‘आस्ते.. आस्ते.. अपने गती पर ब्रेक लगाओ साहब…’ मगरीचे आसू बाहेर काढून माफ करायला सगळेच तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सारखे दिलदार नसतात. तेव्हा सरजी आम्हाला काहीच नको तुम्ही लोकांची कामं करा. लोकांचा नाद करू नका. तुम्ही नियम तोडाल तर कधी ना कधी ‘कर्मा रिटर्न’ येतील आणि त्यावेळी तुमचे मोठ्ठं ‘चलान’ फाटेल. अजूनही वेळ आहे. ‘आवरा तुमच्या वेगाला. सावरा तुमच्याच करीअरला.’

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!