महाराष्ट्र

Vikas Thakre : उपराजधानीचा सत्यानाश पावसामुळे नाही तर नियोजनामुळे

Monsoon Session : नागपूर महापुराचा प्रश्न घेऊन आमदार पोहोचले विधिमंडळात

Post View : 42

Author

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र तुफान पावसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. विशेषतः मागील 24 तासांत नागपुरात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. हा मुद्दा आता थेट विधिमंडळाच्या दारी पोहोचला आहे.

राज्यात सध्या पावसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. विशेषतः विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने लोकांना हैराण केले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते बंद पडल्यामुळे लोकांच्या हालचालींवर मोठा फटका बसला आहे. नागपूरमध्ये देखील गेल्या 24 तासांत तब्बल 114.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी 9 जुलै 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य शासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूरमध्ये पावसामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीवर काँग्रेसचे नेते विकास ठाकरे थेट राज्य सरकार आणि प्रशासनावर थंडाशीर टीका करताना दिसले. ते विधानसभेत म्हणाले  की, दोन दिवस पाऊस थांबला नाही तर नागपूरचा सत्यानाश होणार आहे. मागच्या पावसाळ्याच्या नंतर नद्यांचे रुंदीकरण करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण एक वर्ष पूर्ण होऊनही कोणतेही काम झालेले नाही. विकासाच्या नावाखाली केलेले कॉंट्रॅक्ट तपासायला हवे होते, पण तो झाला नाही, अशा थेट शब्दांत ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला.नागपूर महानगरपालिकेच्या कामकाजाबाबतही त्यांनी कडक टीका केली.

Congress : महावितरणची बत्ती गुल करून अदानींची पॉवर वाढवतील

प्रशासनावर प्रश्न उभे

गेल्या वर्षी घडलेल्या पूरसदृश परिस्थितीवरून सरकारने अनेक कामे मंजूर केली होती. पण ती वेळेत पूर्ण झाली नाही म्हणून आज नागपूरकर पाण्याखालीच आहेत. सरकारने शहरात 1 लाख कोटी रुपयांचे काम केल्याचा दावा केला. पण या पूरासारख्या परिस्थितीमुळे तो दावा कुठला ठाम दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि एमएसआयडीसीचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांच्या कामकाजावरही प्रश्न उभे केले. कोणताही विभाग नियमांकडे न पाहता काम कसे करू शकतो? कायदा आणि सुव्यवस्था या मंडळींवर लागूच होत नाही का? असा कटाक्ष त्यांनी केला.

नागपूर शहरात अनेक लोकांनी 25-25 वर्षे कठोर परिश्रम करून घरे बांधली, पण सतत पडणाऱ्या पावसामुळे ती सर्व काही पाण्याखाली वाहून गेली, हे दुर्भाग्यच आहे, असेही ठाकरे म्हणाले.शासनाकडून नागपूर शहरातील अनियमित बांधकामांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे ठामपणे ते म्हणाले. जर प्रशासनावर कोणाचंही नियंत्रण नाही तर सामान्य जनता कुणाकडे जाईल? असा सवाल त्यांनी केला. नागपूरचा हा पूरप्रश्न फक्त पावसामुळेच नव्हे, तर नियोजनाच्या अभावामुळेही झाल्याचा ठोस आरोप काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. पुढील काळात प्रशासनाने या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नागपूरकरांचे सुरक्षित भविष्य या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या विधान आणि शिस्तीचा शिजवला खमंग संदेश 

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!