महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे गुन्हा नाही

Congress : बळीराज्याला भिकारी समजणाऱ्या नेत्यांना सन्मान; आवाज उठवणाऱ्यांना दंड?

Author

महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी अपमान प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आवाज बुलंद केला. परंतु हा वाद जास्त चिघळल्याने त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन अवघा दुसराच दिवस आणि सभागृहात राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंगळवारी (1 जुलै रोजी) विधिमंडळात प्रचंड गदारोळ झाला. शेतकऱ्यांवर झालेल्या अपमानास्पद विधानांवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी  आक्रमक होत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांची माफी मागण्याची ठाम मागणी केली. यावेळी वातावरण इतकं तापलं की नाना थेट विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या डायसवर चढले आणि राजदंडापुढे उभे राहत संतप्त प्रतिक्रिया नोंदवली.

आक्रमक पवित्र्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. गदारोळाचे मूळ कारण होतं भाजप नेते बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त विधान. या विधानांचा निषेध करताना नाना पटोले यांनी संतापाच्या भरात, मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाही असे विधान केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. या विधानावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली आणि तात्पुरती सभा तहकूब केली. मात्र, नाना पटोले आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यांच्या मते, शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना संरक्षण देणे आणि त्यांच्यावर आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करणे हे लोकशाहीला धरून नाही.

Amaravati : श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वातील अहवाल सर्वोत्तम

राजकीय संघर्ष वाढणार

नाना पटोले यांच्या निलंबनाच्या निर्णयावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहातून बहिष्कार टाकला. काँग्रेस विधिमंडळ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतोय. जर या सभागृहात शेतकऱ्यांबद्दल बोलणे गुन्हा असेल, तर आम्ही तो गुन्हा करत राहू. वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केला की, भाजप महायुतीचं हे सरकार माजलेलं आहे. शेतकऱ्यांना भिकारी समजणाऱ्या नेत्यांना इथे मान देण्यात येतो आणि त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना निलंबित केलं जातं. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनीही भाजप नेत्यांवर सडकून टीका केली.

पटोले म्हणाले, भाजपच्या महायुती सरकारला माज आलाय. यांचे नेते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, कपडे वाटतात आणि मोठेपणा मिरवतात. 2014 पूर्वी लोणीकर उघडाच फिरत होते. आता ते शेतकऱ्यांवर टीका करत आहेत. नाना पटोले यांनी असा सवाल उपस्थित केला की, शेतकऱ्यांवर अपमानास्पद शब्द वापरणाऱ्यांना सभागृहात मानाचं स्थान, पण त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना बाहेर?शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आणि भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. नाना पटोले यांचं निलंबन ही केवळ सुरुवात असल्याचं काँग्रेसच्या हालचालींवरून दिसत आहे. सभागृहातील हा संघर्ष आगामी काळात रस्त्यावर देखील उतरण्याची शक्यता आहे.

Abhijit Wanjarri : नुकसान भरपाईच्या पंचनाम्यांवर शंकेची सावली?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!