महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. रणनीती आणि बैठक सत्र यामध्ये प्रत्येक पक्ष विलीन आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एकच गदारोळ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळे पक्ष आपापल्या खेळपट्टीवर सराव करताहेत. पण महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) तंबूत मात्र ‘इनकमिंग’ नव्हे तर ‘आऊटगोइंग’चा धुमाकूळ सुरू आहे. महायुतीच्या दारात नेत्यांची रांग लागली आहे. जणू काही तिथे पॉवरचा प्रसाद वाटत असावा. आतापर्यंत एमव्हीएमधील अनेक दिग्गजांनी पक्षांतर करून महायुतीत उडी मारली. याचा सर्वाधिक फटका बसला तो शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना.
शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या जहाजातून नेते उड्या मारताहेत शिंदे गट आणि भाजपाकडे. काँग्रेसचेही काही नेते बदल हवाय म्हणत महायुतीत दाखल होताहेत. विधानसभा निवडणुकीनंतर एमव्हीएला लागलेली ही गळती थांबता थांबत नाहीये. जणू काही पक्षाच्या जहाजात छिद्र पडलं आणि पाणी आत येतच आहे. पण मविआमध्ये नेते बाहेर जात आहे. राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. मात्र या धामधुमीत साहेबांचा पक्ष कुठे लपला आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
Gadchiroli : वाळू घोटाळ्यातील दुर्लक्षाची किंमत निलंबनाने चुकवली
राजकीय खेळांची सुरूवात
शरद पवार, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठे गायब झालेत? निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात, पण शरद पवार गटाची तयारी म्हणजे ‘स्लो मोशन’ चित्रपटासारखी दिसते. लोकसभा निवडणुकीत फक्त आठ जागा, विधानसभेत दहा जागा. हे निकाल पाहता, स्थानिक निवडणुकीत साहेब मागे पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांनी बंडखोरी केल्यापासून शरद पवारांची राष्ट्रवादी ‘कछुआ रेस’ खेळतेय. पण आता स्थानिक पातळीवर साहेबांची तुतारी वाजेल की नाही, हा प्रश्न आहे. मैदानात उतरण्याआधीच तीन जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा देत साहेबांना धक्का दिला. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
सर्व नेते पक्षात राहतील की दुसऱ्या पक्षात जंप मारतील, हे पाहण्यासारखं आहे. साहेबांच्या गटात नेते बोटावर मोजता येतील इतकेच उरले आहेत. जर हेही गेले तर ‘गेलं गेलं, सगळं गेलं’ अशी अवस्था राष्ट्रवादीची होणार आहे. हे राजकीय पक्षांतर म्हणजे बिग बॉसचा सीझन वाटतो. एक एक नेते बाहेर पडताहेत आणि महायुतीत जाऊन विनर होण्याची स्वप्नं पाहताहेत. आता स्थानिक निवडणुकीत साहेबांची तयारी हळूच दिसत आहे. साहेब मैदानात उतरताच तीन जिल्हाध्यक्षांनी ‘बाय बाय’ म्हटलं आहे. एमव्हीएला आता गळती रोखण्यासाठी सुपर ग्लू हवा आहे.
Eknath Shinde : निवडणुकीच्या पुरात शिवसेनेची नौका स्वबळावर वल्हवणार