महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : विरोधकांनी उघड केला खाटेवरच्या महाराष्ट्राचा काळा अध्याय

Tribal Healthcare : जंगलात खाचखळग्यांतून चालणाऱ्या विकासाचा आक्रोश

Author

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी भागातील आरोग्य सुविधांच्या अभावावर राज्य सरकारवर तीव्र टीका करत एक व्हिडीओ शेअर केला.

विदर्भातील आदिवासी भाग जिथे झाडीपेक्षा घनदाट राजकीय दुर्लक्ष अधिक आढळते. आजही या भागांमध्ये लोक मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. विकासाच्या घोषणा आणि आर्थिक आकडे गगनाला भिडत असताना, जमिनीवरचा वास्तव मात्र अंगावर शहारे आणणारा आहे. महाराष्ट्रात ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या घोषणा करताना राज्य सरकार उराशी अभिमान बाळगतो. पण प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती ही धक्कादायक आहे. राज्यातील आदिवासी भागात अजूनही रुग्णवाहिका तर सोडाच, रस्ते आणि मूलभूत आरोग्य सुविधा देखील पोहोचलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी एक झंझावाती व्हिडीओ शेअर करून राज्य सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला आहे.

व्हिडीओमध्ये एका गंभीर आजारी व्यक्तीला खाटेवर बांधून काही लोक डोंगराळ, दगडमय रस्त्यावरून रुग्णालयात नेत आहेत. सभोवताली घनदाट जंगल, उखडलेले रस्ते आणि साधनसंपत्तीचा अभाव. या चित्रांमधून केवळ एक रुग्ण नाही, तर आरोग्य व्यवस्थेचे अपयश खडानखडा उघड होते. विजय वडेट्टीवारांनी या व्हिडीओसह लिहिलेले शब्द सरकारसाठी अस्वस्थ करणारे आहेत. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचंय म्हणे, पण येथे अजूनही आदिवासी बांधव रुग्णालयात पोहोचण्याआधी प्राण गमावत आहेत, अशी बोचरी टीका करत त्यांनी राज्य सरकारच्या योजना, गुंतवणूक परिषद आणि परदेश दौऱ्यांवर सवाल उपस्थित केला.

Sanjay Shirsat : शिस्तीचा धडा ऐकूनही मंत्र्यांचा तोंडफाटेपणा थांबला नाही

सरकारच्या आकडेवारीचा फसवा

सरकारला केवळ आकडेवारीचा खेळ खेळायचा आहे. खऱ्या महाराष्ट्राचे दुःख झाकून फक्त चमकधमक दाखवायची आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. ज्यांच्या हातात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आहेत, त्यांनी जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून काय साधलं? असा सवाल त्यांनी केला. सरकारच्या निष्क्रियतेवर टीका करताना वडेट्टीवार म्हणतात, आजही अनेक आदिवासी बांधव पायाला चप्पल नसेल अशा परिस्थितीत जगत आहेत. आजारी व्यक्तीला काखोटीला धरून, खाटेवरून मैलोन्‌ मैल ओढत रुग्णालयात न्यावे लागते. मात्र हे मंत्री हवेत उड्डाण भरत आहेत.

वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारत म्हटले, महायुतीचे पालकमंत्री ‘पद’ घेत बसलेत, पण ‘जबाबदारी’ घेण्यापासून कोसो दूर पळतात. हेच त्यांचे खोट्या कारभाराचे चित्र आहे. असा थेट आरोप त्यांनी केला.या व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य केवळ वाईट रस्त्यांचे नाहीत, तर व्यवस्थेतील बेपर्वाईचेही आहेत. कोणत्याही सुसंस्कृत राज्यात रुग्णवाहिका ही मूलभूत गरज असते. पण या आदिवासी भागांमध्ये ती अजूनही स्वप्न आहे. आजही नागरिक खाटेवरून रुग्णालयात जात आहेत. राज्य मात्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पाहत आहे. विजय वडेट्टीवार यांचा हा आवाज केवळ टीका करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो राज्याच्या नियोजनशून्यतेवर, आणि गरिबी झाकून श्रीमंती दाखवण्याच्या प्रवृत्तीवर कडवट भाष्य आहे.

Sudhir Mungantiwar : खड्ड्यांवर प्रहार, जनतेच्या सुरक्षेला आधार

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!