महाराष्ट्र

Amol Mitkari : थोरातांची ‘कमळा ते ‘राजसंन्यास’ बंदीच्या छायेत

Legislative Council : साहित्य निर्बंध मागणीने महाराष्ट्र ढवळून निघणार

Post View : 24

Author

महाराष्ट्र विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह साहित्य आणि विकिपीडियावरील मजकूरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत असले तरी, यावेळी राजकारणासोबतच काही ऐतिहासिक पुस्तके आणि नाटकेही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या पार्श्वभूमीवर एक नवा वाद उफाळून आला आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांविषयी कथित आक्षेपार्ह साहित्य असलेल्या नाटकांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत यासंबंधी जोरदार मागणी केली आहे.

प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली. अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणातून अटक केली. यावर अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. महापुरुषांच्या बदनामीसाठी जबाबदार असलेल्या साहित्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Devendra Fadnavis : सूडाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक

मिटकरींची ठाम भूमिका

विधान परिषदेतील चर्चेदरम्यान अमोल मिटकरी यांनी सरकारला विचारला की, एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तरी त्यावर तत्काळ कारवाई केली जाते. मग छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई का? नागपूरमधील प्रशांत कोरटकरने धमकी दिल्यानंतर त्याला अटक होण्यासाठी तब्बल एक महिना लागला. अशा प्रकारच्या घटनांना वेळीच आळा बसला पाहिजे, असे ते म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर आणि काही नाटकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे संदर्भ सापडतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटात संभाजी महाराजांचा एक अप्रतिष्ठित प्रसंग दाखवला आहे, तर राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकात देखील त्यांच्याविषयी अपमानकारक मजकूर आहे. यामुळे या साहित्यावर त्वरित बंदी घालावी, अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली.

अपमानास्पद मजकूर

अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत स्पष्ट मागणी केली की, ‘राजसंन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते, थोरातांची कमळा, बेबंदशाही, प्रणयी युवराज, स्वप्न भंगले रायगडाचे आणि इथे ओशाळला मृत्यू’ यांसारख्या नाटकांवर बंदी घालावी. तसेच, विकिपीडिया, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून महापुरुषांविषयी अपमानास्पद मजकूर तातडीने हटवावा.

मिटकरी यांनी असेही सांगितले की, संभाजी महाराज यांच्याविषयी अनेक अपमानजनक साहित्य प्रसिद्ध झाली आहेत. यात 20 नाटके, 40 पुस्तके आणि काही चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व साहित्याचे प्रकाशन, वितरण आणि विक्री यावर बंदी घालावी, अशी त्यांची जोरदार मागणी होती.

सरकारचा निर्णय

अमोल मिटकरी यांच्या मागणीनंतर विधान परिषदेत या विषयावर जोरदार चर्चा रंगली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, इतिहास संशोधकांची एक समिती स्थापन करून छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे ऐतिहासिक सत्य अभ्यासले जाईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!