महाराष्ट्र

Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांच्या गडावर मोदींनी उभारली नववर्षाची गुढी

Narendra Modi Nagpur Visit : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी फडणवीस सज्ज

Author

हिंदू नववर्षनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूरच्या ऐतिहासिक भूमीवर पाऊल ठेवणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शतकपूर्ती वर्षानिमित्त मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. आता फक्त काही मिनिटांचा कालावधीचा राहिलेला आहे. ते संघाचे प्रेरणास्थान असलेल्या हेडगेवार स्मृती मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा पुढील महत्त्वाचा थांबा असेल. दीक्षाभूमी, जिथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत. या ऐतिहासिक भेटीमुळे नागपूर शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

संपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींसोबत असणार आहेत. त्यांचा कार्यक्रमही अतिशय महत्त्वाचा आहे. फडणवीस सकाळी 8.35 वाजता नागपूर विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी हजर असतील. त्यानंतर 8.55 वाजता ते मोदींसोबत स्मृतिमंदिर, रेशीमबाग येथे उपस्थित राहतील. 9.30 वाजता ते दोघेही दीक्षाभूमीला भेट देतील. फडणवीस यांची राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका असल्याने, मोदींसोबत नागपूरच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.

Aditi Tatkare : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भक्कम पाऊल

देवभाऊंची मुख्य भूमिका

दुपारी 12.30 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते सोलार इंडस्ट्रीजच्या टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन होणार आहे. फडणवीसही त्यात प्रमुख उपस्थित राहतील.दुपारी 1.40 वाजता मोदी पुढील दौऱ्यासाठी नागपूर विमानतळावर रवाना होणार आहेत.
दुपारी. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. दुपारी 2 वाजता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्तीचा पदभार स्वीकृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे हा दिवस नागपूरसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मोदी यांचा हा दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा मानला जातो. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर मोदी प्रथमच संघात येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर, या दौऱ्याची वेळ हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या सोहळ्यासोबत साधल्याने, हा दौरा अधिकच विशेष ठरत आहे. गुढीपाडवा हा नवचैतन्याचा उत्सव, नवीन संकल्प आणि नव्या उमेदीने भविष्याकडे वाटचाल करण्याचा दिवस. मोदींच्या या दौर्‍यामध्ये हिंदू नववर्षाच्या नव्या ऊर्जेचा संदेशही दडलेला आहे.

Farmers Loan Waiver : उपमुख्यमंत्र्यानंतर फडणवीसांचा शिक्कामोर्तब

नागपूर सजले

नरेंद्र मोदींच्या या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शुक्रवारीच संपूर्ण कार्यक्रम स्थळी तसेच मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूर शहरातील हा दौरा केवळ संघाच्या शतकपूर्ती वर्षासाठीच नाही, तर हिंदू नववर्षाच्या स्वागताचा भागही आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोदींची ही भेट नागपूरकरांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!