महाराष्ट्र

Narendra Modi : चटके लावणाऱ्या उन्हात अख्खं नागपूर रस्त्यावर

PM Road Show : मोदींसाठी स्पेशल सिक्युरिटी पण पोलिसांची एनर्जी लो

Author

तप्त उन्हाच्या झळा सोसत नागपूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौर्‍याने संपूर्ण शहरात प्रचंड हालचाल निर्माण केली. त्यांच्या स्वागतासाठी रस्ते गर्दीने फुलले होते, आणि नागपूरकरांनी उत्साहाने त्यांची भेट घेतली. मात्र, या सगळ्या धावपळीमध्ये उन्हाच्या तीव्रतेने पोलीस आणि नागरिकांची चांगलीच कसोटी लागली. मोदींनी नागपुरात दाखल होताच सर्वप्रथम रेशीमबाग येथे डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.

रेशीमबाग नंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना श्रद्धांजली अर्पण केली. नंतर माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यातही त्यांनी हजेरी लावली. परंतु, या कार्यक्रमांइतकाच चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे नरेंद्र मोदींचा रोड शो. भर उन्हात शरीराला चटके देत नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी नागपूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

Harish Pimple : मूर्तिजापूरचे आमदार हातात झाडू घेतात तेव्हा…

एसपीजी सुरक्षा

उन्हाने अक्षरशः चटके देत असतानाही, उत्साही नागरिकांनी आपल्या नेत्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, यामुळे पोलिसांची मोठी परीक्षा झाली. तप्त उन्हात रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांची दमछाक झाली. त्यांना कोणतीही विशेष सोय नसल्यामुळे, त्यांना उन्हाचा सामना करावा लागला. मोदींच्या सुरक्षेसाठी ‘स्पेशल एसपीजी सुरक्षा’ यंत्रणा सज्ज होती.

मोहन भागवत यांनाही समकक्ष सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनाही सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी रखरखत्या उन्हात चोखपणे आपले कर्तव्य निभावले.

Devendra Fadanvis : भ्रष्टाचारात अडकलेली नागपूर जिल्हा बँक पुन्हा उभारी घेणार

स्मार्ट सिटीचे कायापालट

मोदींच्या दौर्‍यामुळे संपूर्ण नागपूर शहरात वेगळाच उत्साह दिसून आला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. रस्ते सुशोभित करण्यात आले आणि वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले. मात्र, उन्हाचा सामना करत उभ्या असलेल्या पोलिसांचा त्रास लक्षात घेता, अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी योग्य व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे संपूर्ण शहराचा जणू कायापालटच झाला. ज्या रस्त्यांवरून त्यांचा ताफा जाणार होता, तिथे चकाचक डांबरीकरण, नव्या पेंटचे थर, झाडांना रंगीत फलक, आणि सफाई मोहिमेचे धडाकेबाज आयोजन करण्यात आलं. शहराला एखाद्या उत्सवासाठी सजवल्यासारखं भासू लागलं. पण हा विकास फक्त मोदींच्या स्वागतापुरता होता काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!