प्रशासन

Amaravati Police : नागपूरच्या एनवायरो प्लांटमध्ये कोटींचा गांजा जाळून नष्ट

Vidarbha : नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली अमरावती पोलिसांची यशोगाथा

Author

अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या शिस्तबद्ध नियोजनातून तब्बल एक कोटींचा गांजा नागपूरच्या बुटीबोरीत अधिकृतरित्या नष्ट करण्यात आला. 1999 पासून प्रलंबित असलेल्या 67 गुन्ह्यांचा मुद्देमाल आता न्यायाच्या आगीत विलीन झाला.

अमरावती शहर पोलिस आयुक्तालयाच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये 1999 पासून नोंद असलेल्या 67 एन.डी.पी.एस. कायद्यातील गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला तब्बल 597.079 किलो गांजा अखेर नष्ट करण्यात आला. या गांज्याची अंदाजे बाजारभावातील किंमत 1 कोटी 19 लाख 40 हजार रुपये इतकी होती. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. गांज्याचा नाश नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी येथील महाराष्ट्र एनवायरो पावर लिमिटेड या अधिकृत प्लांटमध्ये इन्सिनेटरच्या सहाय्याने करण्यात आला.

 

कार्यवाहीसाठी विशेष ड्रग डिस्पोजल कमिटीची स्थापना करण्यात आली होती. यात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त कल्पना बारवकर आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांचा समावेश होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून परवानगी घेऊन हा गांजा अधिकृतपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करण्यात आला.

Mohan Bhagawat : संघाच्या विचारधारेत आता सर्व धर्मांना स्थान

प्रभावी अंमलबजावणी

 

मोहिमेत अमरावती शहरातील नागपुरी गेट (43), बडनेरा (8), गाडगेनगर (6), खोलापुरी गेट (4), राजापेठ (3) आणि सिटी कोतवाली (3) या पोलिस ठाण्यांतील एकूण 67 गुन्ह्यांचा समावेश होता. या सर्व गुन्ह्यांचा न्यायालयीन निकाल लागलेला असल्यामुळे त्यातील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

 

संपूर्ण प्रक्रियेस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, एनवायरो कंपनीचे व्यवस्थापक, दोन पंच, तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या उपस्थितीत पारदर्शकतेने अंमलात आणण्यात आले. गांज्याचे संपूर्ण जळण आणि नाश इन्सिनेटरच्या मदतीने करण्यात आले, जे पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित पद्धत मानली जाते.

Nagpur : रामाच्या रथयात्रेला रहमानचे सलाम

प्रशासकीय समन्वय 

 

कारवाई पोलिस प्रशासनाच्या एकात्मिक आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे मूर्त उदाहरण ठरली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, सहायक उपनिरीक्षक कैलास सानप, तसेच कर्मचारी अजय मिश्रा, सुधीर गुडधे, अजय निस्ताने, नईम बेग, विशाल वाकपांजर यांच्या सक्रिय सहभागाने ही कारवाई अचूकपणे पार पडली.

 

घडलेल्या प्रकरणातून प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय, कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत असलेली कटिबद्धता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित होते. अमरावती पोलिस आयुक्तालय आणि नागपूर येथील अधिकृत संस्थांच्या सहकार्यातून हा ड्रग नाश मोहिमेचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!