
गडचिरोली जिल्ह्यात परत एकदा धान घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून गडचिरोलीतील धानाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जिल्ह्यात धान खरेदी व साठवण प्रक्रियेत अनियमिततेचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दिवसांत विशेषतः राइस मिल मालकांना धमकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अधिवेशनातही काही एजंट आणि मध्यस्थांनी खंडणीसाठी या मालकांना एलएक्यु लावण्याची भीती दाखवून आर्थिक मागण्या केल्याचे उघड झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण धान खरेदी आणि साठवण प्रक्रियेचा तपशीलवार आढावा घेतला जात आहे. प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, धान खरेदी व साठवण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत देऊळगाव धान खरेदी केंद्रात तब्बल 1 कोटी 53 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. तपासणीत आढळले की, 19 हजार 860 क्विंटल धान आणि 49 हजार 751 बारदानामध्ये मोठी तफावत आहे.

Teacher’s Rights : शिक्षकांच्या संघर्षाला मिळालं मंत्रालयात बळ
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाच्या भरडाई प्रक्रियेतही मोठे गैरप्रकार समोर आले आहेत. ठरावीक प्रमाणाऐवजी कमी धान भरले गेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेत आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गडचिरोलीतील अनेक भागांत धान घोटाळा वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.
घोटाळा प्रकरणात तब्बल 22 लाख 42 हजार रुपयांची वसुली सुरू आहे. सोबतच सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचा बडगा उचलण्यात आला आहे. सिरोंचा येथे 2011 मध्ये झालेल्या धान्य अपहार प्रकरणात 24 लाख 8 हजार रुपयांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित आहे. या घोटाळ्याशी संबंधित 13 राइस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये धानाच्या साठ्यांची शंभर टक्के तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Atul Londhe : काँग्रेसनेच राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला
राइस मिलर्सवर कारवाई
पॅडी होर्डिंग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राइस मिलर्सवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. धान खरेदी आणि साठवण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना माफी नाही, असे प्रशासनाने ठणकावले आहे. हे सर्व घडामोडी पाहता, धान घोटाळ्याच्या प्रकरणात मोठ्या कारवाईचा वेग वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि कायदा यावर कठोर नजर ठेवून आहे, त्यामुळे दोषींवर लवकरच मोठी कारवाई होऊ शकते.