
गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी ध्यान व विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कधीकाळी रक्तरंजित संघर्षाच्या छायेत हरवलेला पूर्व विदर्भ, आज परिवर्तनाच्या प्रवाहात झेपावू पाहत आहे. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे कधी काळी माओवादी हिंसेच्या जबड्यात अडकले होते. नागरिकांना मोकळेपणाने फिरण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. मात्र, सरकार, प्रशासन आणि पोलिस दलांच्या सामूहिक प्रयत्नांतून गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांतून माओवाद जवळपास संपुष्टात आला आहे. याच पार्श्ववभूमीवर आता गडचिरोलीत पोलिसांकडून माओवाद्यांची ध्यान आणि विपश्यना शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोलीतील काही दुर्गम भागांत अजूनही काही चळवळींचे अवशेष शिल्लक आहेत, पण त्यांची ताकद आता पूर्णपणे खचली आहे. पूर्व विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची तयारी सुरु झाली आहे. आदिवासींना माओवादी चिटकनी देत असतात. त्यांचे त्यांचे मन भरकटवतात. विचारधारेने भरकटलेले तरुण, आता नवजीवनाच्या शोधात आहेत. अनेक वर्षं शस्त्र हाती घेतलेले हे युवक आता मन:शांतीच्या वाटेवर वाटचाल करत आहेत. पोलिस दलांनी केवळ त्यांच्याशी लढा दिला नाही, तर त्यांना नवे जीवन देण्यासाठी पुढाकारही घेतला आहे.

वेदांचा उल्लेख
आत्मसमर्पण केलेल्या माओवादी कार्यकर्त्यांना मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक स्थैर्य मिळावे, यासाठी ध्यान आणि विपश्यना शिबिरांचे आयोजन करण्यात आले. असं मानलं जातं की, मन आणि शरीर स्थिर असेल तर माणूस कोणतीही अडचण पार करू शकतो. वेदांमध्येही याचा उल्लेख आहे. या विचारांना अनुसरून गडचिरोली पोलिस दलाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. धम्म वसुंधरा विपश्यना समिती देसाईगंजच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात 102 आत्मसमर्पित माओवाद्यांनी सहभाग घेतला.
पोलिसांचा हा उपक्रम केवळ पुनर्वसनासाठी नाही, तर त्यांच्या अंतरात्म्याला नवे वळण देण्यासाठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी कारवायांमध्ये मोठी गती आली आहे. राज्य सरकारच्या ठोस आणि निर्णायक भूमिकेमुळे माओवाद्यांच्या हालचालींना मोठा आळा बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीपासूनच गडचिरोलीच्या परिस्थितीकडे विशेष लक्ष दिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णायक मोहिमा राबवल्या जात आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या माओवाद्यांचा एन्काऊंटर झाला आहे.
Umred Blast : एमएमपी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर पोलिसांचा खटला
पोलिसांचे सहकार्य
माओवाद तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. शस्त्रसाठा हस्तगत केला गेला आहे. वर्षानुवर्षे जंगलांमध्ये दहशत पसरवणारे जहाल माओवादी आता आत्मसमर्पण करत आहेत. एकेकाळी जंगलांमध्ये लपून पोलिसांवर हल्ला करणारे हेच माओवादी कार्यकर्ते, आता पोलिसांच्या सहकार्याने ध्यानधारणेच्या मार्गावर आहेत. हे दृश्य परिवर्तन किती खोलवर घडले आहे, याची प्रचिती देतं. जंगलांमध्ये आता पोलिसांची गस्त वाढली आहे, हालचालींवर काटेकोर नजर ठेवली जाते. पण ही नजर केवळ सुरक्षा देणारी नाही, तर नव्या सुरुवातीसाठी उभारलेला एक आधारस्तंभ आहे.
Education Department : विदर्भातील शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल