महाराष्ट्र

Sunil Mendhe : मुखी रामनाम, मनी जनसेवेचे व्रत

Birthday Special : मेंढेंच्या मेहनतीने भंडाऱ्याला मिळाले नवे भविष्यदर्शन

Share:

Author

भंडारा जिल्ह्याचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा जीवनप्रवास संघर्ष, मेहनत आणि समाजसेवेने भरलेला आहे. त्यांच्या प्रेरणादायक कार्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात विकासाचे नवे अध्याय लिहिले गेले आहेत.

राजकारणात नशिबाचा मोठा वाटा असतो, हे अनेकदा ऐकायला मिळतं. पण या नशिबाला मेहनतीची जोड लाभली, तर साधा कारसेवकाही थेट संसद भवनात पोहोचू शकतो, हे उदाहरण म्हणजेच भाजपचे माजी खासदार सुनील बाबूराव मेंढे. 14 एप्रिल रोजी त्यांचे कुटुंब आणि कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत.  सकस कुटुंबात जन्मलेले सुनील मेंढे यांचा जन्म साकोली तालुक्यातील मुरमाडी तुपकर या गावी झाला. वडील बाबूराव मेंढे डॉक्टर, तर आई प्रतिभा आरोग्य सेविका. अशा कुटुंबातून आलेल्या सुनील मेंढेंनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि आयुष्याच्या आरंभी संघटनात्मक कामाला वाहून घेतलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यातून भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीपर्यंत आणि नंतर नगराध्यक्षपदावर त्यांनी जबरदस्त प्रभाव निर्माण केला. राजकारणातील अनपेक्षित वळण 2019 साली घडले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकताच, भंडाऱ्यात नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला. पक्षाने उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा विचार केला, आणि नगराध्यक्ष असलेले सुनील मेंढे यांच्याकडे लक्ष गेले. संघाच्या ओके नंतर त्यांना उमेदवारी मिळाली, आणि त्यांनी तब्बल 1 लाख 97 हजार 500 मतांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ जिंकून घेतला.

Parinay Fuke : संविधानाचे वारसदार आंबेडकर स्मारकाच्या लोकार्पणासाठी पुढे

गडकरींचा पाठिंबा

राजकारण म्हणजे केवळ निवडणुकांचा खेळ नव्हे, तर विकासासाठीच्या संधींना ओळखून, त्या प्रत्यक्षात उतरवण्याचं माध्यम. माजी खासदार सुनील मेंढे हे याचे जिवंत उदाहरण. खासदारकी संपल्यानंतरही त्यांनी पद गेलं, पण जबाबदारी नाही ही भूमिका घेत जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपली धडपड कायम ठेवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक असलेल्या सुनील मेंढे यांनी 1987 मध्ये शाखा शिक्षक म्हणून सुरुवात केली. 1989 मध्ये बजरंग दलाचे जिल्हा संयोजक, तर 2014 मध्ये संघाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

भंडारा नगराध्यक्षपदाची उमेदवारीही त्यांनी 2016 मध्ये मिळवून 22 हजार मतांनी विजय मिळवला. कोरोनाच्या कठीण काळात ज्या नेत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली, त्यात भंडाऱ्याचे माजी खासदार सुनील बाबूराव मेंढे यांचे नाव कायमचा ठरले आहे. त्यांची प्रेरणा आणि जिद्द आजही अनेक लोकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या मित्रमंडळाकडून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यात 50 हून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत. नितीन गडकरींच्या पाठिंब्यामुळे केंद्रातील योजनांचा लाभ मतदारसंघात पोहचवण्यात त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला.

Nagpur : धोक्याच्या छायेत नागपूरचा औद्योगिक पट्टा

समाजकारणात सक्रिय नेतृत्व

बिरसी विमानतळ, राईस कॉरिडॉरसारखे प्रकल्प त्यांनी प्रभावीपणे आणले. शिक्षण, सेवा आणि संघटन कौशल्य यांच्या जोरावर माजी खासदार सुनील मेंढे आजही प्रभावी नेतृत्वाचं उदाहरण ठरतात. माजी खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे रेल्वे रॅक पॉईंट मंजुरीसाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं. धान्य, भाजीपाला आणि खतांच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. याशिवाय, गोंदिया–बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या 4 हजार 819 कोटींच्या दुहेरीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यातही मेंढे यांचा मोलाचा वाटा आहे.

अत्यंत प्रतिकूल हवामानात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. उन्हाळ्यातील उष्माघात आणि हिवाळ्यातील हायपोथर्मियामुळे होणाऱ्या मृत्यूंना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मदतीची मागणी केली. राजकारणाबरोबरच समाजकारणाची भान ठेवत माजी खासदार सुनील मेंढे आजही लोकहितासाठी सक्रिय आहेत. आपल्या कार्यकाळात मेंढे यांनी भंडारा जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांना चालना दिली.

Wardha : चार महिन्यांचे आमदार पण कामगिरी दमदार

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!