प्रशासन

Buldhana : मेहकर नगर परिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक   

Municipality Fire : अतिक्रमण हटवायचं म्हणता म्हणता पुरावेच झाले आउट ऑफ स्टॉक

Author

बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद कार्यालयात भीषण आग लागून रेकॉर्ड रूममधील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.

अतिक्रमणविरोधी कारवाईने आधीच चर्चेत असलेली बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद पुन्हा एकदा धक्कादायक घडामोडीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 3 मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास नगर परिषदेच्या कार्यालयात भीषण आग लागली. विशेष म्हणजे ही आग थेट रेकॉर्ड रूममध्ये लागल्याने सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सकाळी अचानक उठलेल्या आगीने परिसरात खळबळ उडवून दिली. आग एवढी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण रेकॉर्ड रूम जळून खाक झाली.

आगीमुळे शेकडो महत्वाचे दस्तऐवज, भूखंडांची कागदपत्रे, अतिक्रमणाशी संबंधित पुरावे आणि अन्य फायली आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग नियंत्रणात येईना. दुर्दैवाची बाब म्हणजे, मेहकर नगर परिषदेचे अग्निशामक वाहन सध्या दुरुस्तीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात असल्याने वेळेवर कोणतीही मदत मिळू शकली नाही. शेवटी लोणार नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर तासाभरानंतर नियंत्रण मिळवले.

Nagpur : मेट्रो स्टेशनला आग, नागरिकांची धडपड

दस्तावेजांची होळी

आगीत रेकॉर्ड रूममधील सर्वच दस्तऐवज खाक झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून आगीचे कारण शॉर्ट सर्किट असे सांगितले जात असले तरी अनेकांनी यावर शंका व्यक्त केली आहे. कारण या आगीची वेळ, जागा आणि पार्श्वभूमी पाहता अनेक संशय निर्माण झाले आहेत. सदर आगीच्या केवळ काही दिवसांपूर्वीच, मेहकर नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस विभाग यांनी शहरातील मोठ्या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम जाहीर केली होती. मेहकर ते डोणगाव, रिसोड आणि जानेफळ रोड या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी 2 ते 4 एप्रिल दरम्यान मोठी मोहिम राबवली जाणार होती.

संबंधित मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणीही पालिकेकडून करण्यात आली होती. ती मान्यही करण्यात आली होती. अशा वेळी अचानक रेकॉर्ड रूम जळून जाणे ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. यापूर्वीही 31 मार्च 2022 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अग्निकांड घडले होते, ज्यात महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली होती. नुकतेच 2 मे रोजी बुलढाण्यासह संपूर्ण विदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि इतर मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता.

Parinay Fuke : जातनिहाय जनगणना ही आमच्या वर्षानुवर्षांच्या लढ्याचं फलित

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!