महाराष्ट्र

Prashant Padole : सर्जिकल स्ट्राईकसाठी शस्त्र नाही, स्टेथोस्कोप घेऊन सज्ज

India Pakistan War : राजकारणाच्या मंचावरून थेट युद्धभूमीकडे

Post View : 26

Author

भंडारा-गोंदियाचे खासदार आणि डॉक्टर असलेले डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारला एक प्रेरणादायी विनंती केली आहे. युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्याची तयारी दर्शवत त्यांनी एक महिन्याचा पगारही राष्ट्रासाठी समर्पित केला आहे.

भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत संपूर्ण देशभरात देशभक्तीची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारला थेट पत्र लिहून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वेच्छेने युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार असल्याचे जाहीर केले. एक महिन्याचा संपूर्ण पगारही राष्ट्रसेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना संबोधित या पत्रात, डॉ. पडोळे यांनी देशासाठी सध्या असलेली परिस्थिती अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीची असल्याचे नमूद केले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांची व आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे, हे एक डॉक्टर म्हणून माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रशांत पडोळे यांनी म्हटले आहे.

Pratap Sarnaik : डिझेलच्या धुरातून हरित प्रवासाकडे, एसटीचा नवा स्वप्नरथ 

राष्ट्रासाठी भक्कम

जर गरज भासली, तर मला थेट युद्ध क्षेत्रात पाठविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर म्हणून त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली आहे. मात्र राष्ट्रसेवा ही त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च जबाबदारी मानतात. डॉ. पडोळे यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण विनंतीही केली आहे. त्यांनी इतर माननीय खासदार, जनप्रतिनिधी आणि नागरिक यांनाही आपल्या सामर्थ्यानुसार राष्ट्रासाठी काहीतरी देण्याचे आवाहन केले आहे. हे काळ एकजुटीचे, सेवा भावनेचे आणि संकल्पाचे आहे, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

या निर्णयामुळे डॉ. पडोळे यांच्या सामाजिक भानाबद्दल आणि राष्ट्रीय कर्तव्यभावनेबद्दलचा सकारात्मक संदेश त्यांच्या मतदारसंघात तसेच संपूर्ण देशात पोहोचला आहे. त्यांनी केवळ शब्दांतच नव्हे तर कृतीतूनही आपली बांधिलकी दाखवली आहे. युद्धजन्य परिस्थितीत प्रत्यक्ष सेवेसाठी तत्पर राहण्याचा निर्णय घेणे हे केवळ धैर्याचेच नाही तर प्रेरणादायी देशभक्तीचे उदाहरणही आहे.

Uday Samant : शहीद मुरली नाईक यांच्या स्मृतीसाठी स्मारकाची घोषणा

निर्णयाचे कौतुक

भंडारा-गोंदिया मतदारसंघातील अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून त्यांचे स्वागत केले असून अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुकही केले आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या किंवा युद्धजन्य परिस्थितीच्या काळात डॉक्टरांचा पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे, आणि डॉ. पडोळे यांनी ही भूमिका लिलया स्वीकारली आहे.

एकीकडे राजकारणातील अनेक नेते फक्त शब्दांची उधळण करत असताना, दुसरीकडे डॉक्टर-खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी कृतीच्या माध्यमातून देशसेवेचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या पावलामुळे देशातील इतर प्रतिनिधींनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही वेळ राष्ट्रासाठी उभं राहण्याची आहे. डॉ. पडोळे यांचा संदेश संपूर्ण देशासाठी एक जागृतीपर आवाहन आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!