महाराष्ट्र

Maharashtra : थेट डोनाल्ड ट्रम्पच आले लाडक्या बहिणींसाठी धावून 

Rohini Khadse : अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केली अजित पवार यांच्याशी चर्चा 

Post View : 20

Author

डोनाल्ड ट्रम्पचं ट्वीट, अजितदादांची रात्री बैठक, आणि लाडक्या बहिणींसाठी ऐतिहासिक घोषणा. महाराष्ट्राचं राजकारण थेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेली योजना बनली आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेतील मानधन एक हजार 500 रुपयांवरून थेट दोन हजार 100 रुपये करण्याचे मोठे गाजावाजा करून आश्वासन दिले होते. मात्र, सरकार सत्तेवर आल्यानंतरही या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही, आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर धसका घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी एक भन्नाट मीम शेअर करून सरकारला चिमटा काढला. विशेष म्हणजे या मीममध्ये कोणताही संबंध नसलेल्या, अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख आहे. हो, अगदी बरोबर वाचलंत, डोनाल्ड ट्रम्प महाराष्ट्राच्या ‘लाडक्या बहिणी’ंसाठी मध्यस्थी करताना दाखवले गेले आहेत.

दरमहा रक्कम

खडसेंनी ट्विटरवर शेअर केलेल्या मीममध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, अजित पवार यांच्याशी रात्री उशिरा चर्चा केल्यानंतर मला सांगायला आनंद होतो की, जूनपासून लाडकी बहीण योजनेतून दरमहा दोन हजार 100 रुपये देण्यास ते तयार झाले आहेत. जय महाराष्ट्र! हे मीम पाहून नेटकऱ्यांनी हसून हसून सोशल मीडियाचा जल्लोष केला.

Devendra Fadnavis : गोरेवाडाच्या कुशीत निसर्गाची नवी गाथा

या विनोदी अंदाजातून रोहिणी खडसेंनी सरकारच्या न केलेल्या वचनपूर्तीवर बोट ठेवले आहे. निवडणूक संपून सरकार स्थापन होऊन आता महिने उलटले असताना देखील ‘लाडकी बहीण’ योजनेचा वाढीव निधी कधीपासून मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

महिलांचे लक्ष सरकारकडे

सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार 500 रुपये मिळतात. परंतु निवडणुकीत दोन हजार 100 रुपयांचे आश्वासन मिळाल्यानंतर अनेक महिलांनी आपल्या घराच्या बजेटमध्ये हे लक्षात ठेवून योजनांची आखणी केली आहे. त्यामुळे सध्या सगळ्या “लाडक्या बहिणी” 600 रुपयांच्या प्रतिक्षेत आहेत. योजना वाढवण्यासाठी सरकारकडून इतर योजनांचा निधी वळवला जातोय, असा आरोपही विरोधकांकडून सातत्याने केला जातोय.

रोहिणी खडसेंच्या मीमने लक्ष वेधलं असलं तरी त्यामागे गंभीर राजकीय संदेश आहे. सरकारने दिलेलं वचन पूर्ण करायचं की ट्रम्पच्या मीमवरच सगळं थांबवायचं? लाडक्या बहिणींच्या नजरा आता अजितदादांकडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लागल्या आहेत. शेवटी दोन हजार 100 रुपयांचा आकडा प्रत्यक्ष खात्यात कधी जमा होतो, हेच पाहावं लागणार.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!