प्रशासन

Nagpur : उपराजधानी बनली ड्रग्जची ट्रान्झिट पॉईंट

Police Action : वीस दिवसांत एक कोटींहून अधिक अंमली पदार्थांचा साठा जप्त

Author

नागपूरमध्ये अलीकडच्या काळात अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पोलिसांनी यावर कारवाई करत विशेष मोहीम सुरू केली आहे.

अमली पदार्थ तस्करीचं जाळं पुन्हा एकदा नागपूर पोलिसांच्या रडारवर आलं आहे. झपाट्याने बदलणाऱ्या तस्करीच्या पद्धती आणि वाढती मागणी यामुळे गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी पथकाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम उभी केली आहे. तिचा पहिला टप्पा अत्यंत प्रभावी ठरला आहे.

गेल्या अवघ्या 20 दिवसांत नागपूरमध्ये तब्बल 1 कोटी 43 लाख 12 हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मेफेड्रोन (एमडी) या जीवघेण्या ड्रग्जचा 1 किलो 258 ग्रॅम साठा सापडला आहे. एकूण 167 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू असून त्यांनीच ही माहिती दिली.याआधीच्या चार महिन्यांच्या काळात (जानेवारी ते एप्रिल) अमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे 58 लाख 44 हजार रुपयांचा ड्रग्ज जप्त केला होता.

Nagpur : वार्षिक महापुराचा रिपीट टेलिकास्ट लवकरच

पानमसाल्यातील जाळं

यामध्ये केवळ 380 ग्रॅम मेफेड्रोनसह अफीम व गांजाचा समावेश होता.  सोबतच 125 आरोपींना अटक करण्यात आली होती. याच्या तुलनेत मे महिन्याच्या फक्त 20 दिवसांत दुप्पटपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त झाले आहेत. ही चिंतेची बाब आहे. याचं गांभीर्यही पोलिस प्रशासनाने ओळखलं आहे. मेफेड्रोनचा वापर प्रचंड वेगाने वाढत असून त्याचे सेवन आता पानमसाल्यात मिसळून मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. विशेषतः सुगंधी तंबाखू किंवा पानमसाला पदार्थांमध्ये ड्रग्ज मिसळून ते तरुणाईपर्यंत पोहोचवले जात आहे.

काही प्रमाणात (सुमारे 1टक्के) हेच ड्रग्ज थेट इंजेक्शनमधूनही घेतले जात असल्याचे उघड झाले आहे. हे प्रमाण कमी असले तरी धोक्याचे आहे.राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेश येथून अफीम, तर आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा व ईशान्य राज्यांतून गांजा नागपूरमध्ये आणला जातो. येथे त्याचे वितरण आणि विल्हेवाट लावून ते इतर राज्यांत पाठवले जाते. त्यामुळे नागपूर हे देशातील एक महत्वाचे ड्रग ट्रांजिट पॉईंट बनले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर गुन्हे शाखेने विशेष पथके कार्यरत केली आहे.

Bhushan Gavai : अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना बार कौन्सिलचा इशारा

पोलिसांची हेल्पलाईन सक्रीय

मिळालेल्या गुप्त माहितीवर वेळीच कारवाई करून ड्रग विक्रेत्यांना गजाआड केले जात आहे. पोलिसांनी ‘1933’ नॅशनल नार्कोटिक्स हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. यावर नागपूरकर नागरिक ड्रग्ज तस्करीबाबत माहिती देऊ शकतात.फक्त तस्करांवरच नाही, तर व्यसनाधीन व्यक्तींच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न केले जात आहेत. व्यसनाधीन व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण समाजासाठी 24×7 मदतीची हेल्पलाईन ‘1800 11 0031’ सुरू करण्यात आली आहे. या नंबरवर नागरिक कोणत्याही वेळी मदत मागू शकतात.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!