देश

Yashomati Thakur : महिलांच्या अपमानावर भाजपचे नेते बरळतात, मोदी गप्प बसतात

Political Drama : ऑपरेशन सिंदूरची गाथा बनली वादग्रस्त वक्तव्यांची जाळी

Post View : 20

Author

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी शहीदांच्या पत्नींवर आणि भारतीय लष्करावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादळ उठले.

देशात भारत-पाकिस्तान संघर्षाचा तणाव वाढत असतानाच, भाजपच्या एका नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे देशभरात चर्चा रंगली आहे. भारताने पाकिस्तानवर केलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई सैन्याच्या शौर्याची आणि एकात्मतेची साक्ष देणारी मानली जाते, ज्यात महिलांचा सहभाग विशेष ठरला. मात्र, या आनंदाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकारणात वादळ उठले आहे.

पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जबरदस्त प्रत्युत्तर दिले. या मोहिमेत महिलांनी देशासाठी दाखवलेली शौर्य भावना देशभरात अभिमानाची लाट उडवली. मात्र, ऑपरेशन सिंदूरवर होत असलेल्या सकारात्मक चर्चेमध्ये अचानक मध्यप्रदेशातील एका मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाचा जनम झाला आहे. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर टीका करत संपूर्ण देशात राजकीय वादळ उडवलं. भाजपाच्या आणखी एका नेत्याने केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण आणखीच तापले आहे.

Ramtek : संघाच्या सेवकांना सांगितली जाणार तिघांची महानगाथा

काँग्रेसचा भाजपवर हल्ला

हरियाणाचे भाजप राज्यसभा खासदार रामचंद्र जांगड यांनी पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महिलांविषयी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी शहीद झालेल्या महिलांच्या त्यागाचा अपमान करणारा असा दावा केला आणि त्या महिलांमध्ये वीरांगनांचा जोश नव्हता असं सांगितलं. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्वरित प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार टीका केली आहे. यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, मोदीजी, तुमच्या पक्षात अशी मंडळी महिलांच्या सिंदूरचा अपमान करत आहेत, तरीही तुम्ही का शांत आहात? अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? जर काही होत नसेल, तर समजायला हवे की तुम्हीही अशा वक्तव्यांना समर्थन देता.

रामचंद्र जांगडांनी एका कार्यक्रमात हेही म्हटले की, जर पर्यटक दहशतवाद्यांच्या समोर हात जोडले नसते, तर 26 लोकांचा जीव वाचू शकला असता. त्यांनी पुढे सांगितले की, जे प्रशिक्षण पंतप्रधान मोदी देत आहेत, जर ते प्रशिक्षण त्या लोकांकडे असते तर हा मृत्यू टाळता आला असता. त्यांच्या मते, दहशतवाद्यांकडे जे काही होते लाठ्या, दांडे जर पर्यटकांनी त्यांच्यावर आत्मरक्षण केले असते, तर केवळ काही लोकांचा बळी झाला असता आणि दहशतवादीही ठार झाले असते. पण हात जोडून कोणालाही वाचवणं शक्य नाही.

Chhagan Bhujbal : मुंडेंना मिळाली क्लीनचीट तर सोडून देणार सीट

जांगडांनी शहीद झालेल्या महिलांविषयी खळबळजनक विधान करत म्हटले, पहलगाममधल्या शूर बहिणी ज्यांच्या मंगळसूत्राचा सिंदूर घेतला गेला, जर त्यांनी अहिल्याबाईंचा इतिहास वाचला असता, तर अशा हल्ल्याला त्या कधीच तोंड देण्यास मागे हटल्या नसत्या. पण त्या महिलांमध्ये वीरांगनांचा जज्बा आणि जोश नव्हता, म्हणून त्यांनी हात जोडून आपला जीव गमावला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!