महाराष्ट्र

Devendra Bhuyar : मोर्शी-वरूड होणार चॅम्पियनशिपचं गर्भगृह

Morshi Sports Complex : देवेंद्र भुयारांचं खेळप्रिय स्वप्न उजळलं 

Author

‘जिथं इच्छा असते, तिथं मार्ग निघतो’ हे वाक्य जर प्रत्यक्षात कोणी सिद्ध केलं असेल, तर ते माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी. मोर्शी-वरूडच्या मातीतून राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्यासाठी पाठपुरावा करत आठ कोटी रुपयांचा भक्कम निधी खेचून आणला. हे यश केवळ निधी मंजुरीपुरते मर्यादित नाही, तर हे यश आहे त्या खेळाडूंच्या भविष्याचे जे अजून उदयास यायचे आहे.

मोर्शी आणि वरूडमध्ये उच्च दर्जाच्या क्रीडा संकुलांची उभारणी करण्यासाठी शासन दरबारी देवेंद्र भुयार यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या अथक परिश्रमांना आता प्रत्यक्ष फळ मिळाले असून राज्य सरकारने आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून दोनही ठिकाणी अत्याधुनिक आणि तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण अशी क्रीडा संकुले उभारली जाणार आहेत.

मूलभूत व प्रगत सुविधा

भुयार यांनी सांगितले की, मोर्शी येथे तीन कोटी 76 लाख 24 हजार रुपये आणि वरूड येथे तीन कोटी 72 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकांमध्ये टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल ग्राउंड, मल्टी-परपज खेळाचे मैदान, वॉकिंग ट्रॅक, 200 मीटर धावण्याचा ट्रॅक यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा, अग्निशमन व्यवस्था, इनडोअर हॉल यासारख्या मूलभूत व प्रगत सुविधा दिल्या जाणार आहेत.

Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या दारात नुकसानभरपाईचं झडप

जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म’

वरूड व मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात असंख्य खेळाडूंपुढे संधीचं दार उघडणार आहे. स्पर्धा परीक्षांपासून ते ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय मंचापर्यंत आपली छाप पाडणाऱ्या युवकांना आता स्थानिक स्तरावरच दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. यामुळे खेळाडूंसाठी पुणे-मुंबईच्या क्लासिक अकादम्यांकडे बघण्याची गरज उरणार नाही. या संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करून स्थानिक खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात घडवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, अशी ठाम भूमिका भुयार यांनी घेतली आहे. या संकुलांमधून उद्याचे राष्ट्रकुल, आशियाई, ऑलिम्पिक पदक विजेते तयार व्हावेत यासाठी हा संपूर्ण प्रकल्प आखण्यात आला आहे.

शब्द नव्हे, कृती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तत्कालीन क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि विद्यमान मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे विशेष मागणी करत देवेंद्र भुयार यांनी हा प्रस्ताव वेळोवेळी सादर केला. कधी तांत्रिक आढावा, तर कधी प्रशासकीय मंजुरीची मागणी, त्यांनी कोणतीही पायरी न चुकता या प्रकल्पासाठी आक्रमक प्रयत्न केले त्यांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही, परंतु आवश्यक सुविधा नसल्यामुळे त्यांचा विकास अडखळतो. आता याला पूर्णविराम मिळणार आहे. हे संकुल केवळ मैदान नाही, हे आहे एक स्वप्न साकार होण्याचं केंद्र.

Nagpur : सत्ता हातात असूनही रस्त्यावर उतरले भाजप आमदार

भविष्यातील योजना 

केवळ खेळाची मैदानं नव्हे, तर योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षकांची व्यवस्था, आधुनिक साधनं, फिटनेस ट्रेनिंग, डायट प्लॅन, व्हिडिओ अनालिसिस सुविधा – हे सर्व या क्रीडा संकुलात उपलब्ध होईल. मोर्शी आणि वरूड येथील या प्रकल्पांचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून, यासाठीही पुढील निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. एकीकडे सत्तेपासून दूर असतानाही भुयार यांनी विकासाची कामं करण्याचा निर्धार सोडलेला नाही. हा निधी मिळवून त्यांनी दाखवून दिलं की, विकासाची सुरुवात केवळ मंत्रिपदावरून होत नाही, ती होते दृढ इच्छाशक्ती आणि भूमिकेवरून. या संकुलामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्याला एक नविन क्रीडा ओळख मिळणार आहे, आणि मोर्शी-वरूड हे नाव आता खेळाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे, हे निश्चित.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!