महाराष्ट्र

NCP Akola : अमोल मिटकरींनंतर देशमुख यांचा होणार ‘विजय’

Vidhan Parishad : नावापुढे आमदार लावण्याबाबत दादा अनुकूल

Post View : 107

Author

अमोल मिटकरी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत आला असतानाच त्यांच्या जागी विजय देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी खुद्द हिरव्या पेनाने देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत. लवकरच अमोल मिटकरी यांचा आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.  त्यांनी आतापर्यंत सुमारे 500 कोटी रुपयांचा आमदार विकास निधी खर्च केला आहे. अमोल मिटकरी यांना पुन्हा आमदारकी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यांच्या जागेवर आता विजय देशमुख यांच्या नावावर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी हिरव्या पिनाने सही केल्याची विश्वसनीय माहिती आहे.

अलीकडेच अजित पवार यांचा अकोला दौरा पार पडला. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे खामगावचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्या जागी कोणाला बसवायचे याबद्दल नेत्यांची चर्चा केली. त्यामध्ये विजय देशमुख यांच्या नावावर सर्व सहमतीने शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

सर्व वादांपासून दूर

एकेकाळी विजय देशमुख हे नारायण राणे यांची कट्टर समर्थक होते. अकोला महापालिकेच्या राजकारणामध्ये विजय देशमुख हे अनेक वर्षांपर्यंत सक्रिय होते. त्यांचा  मोठा दबदबा राजकीय वर्तुळात आहे. याशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर विजय देशमुख यांचे राजकीय वजन वाढले. विजय देशमुख हे अलीकडच्या काळातील सर्व वादांपासून आणि वादग्रस्त प्रकरणांपासून दूर आहेत. त्यांच्यावर कोणतीही टीकाटिप्पणी किंवा आरोप प्रत्यारोप झालेले नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला आमदार करावे, अशी अजित पवार यांची इच्छा असल्याची माहिती आहे.

अमोल मिटकरी हे विधान परिषदेचे आमदार असताना त्यांच्या नावाभोवती अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले. अजित पवार यांच्या विषयी कोणी काही बोलले की, अमोल मिटकरी हे त्यांच्यावर सडकून टीका करतात. इतकेच नव्हे तर स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या कंपनीच्या प्रमुखा विरोधातही अमोल मिटकरी यांनी भाष्य केले होते.

Amol Mitkari : अकोल्याच्या वीज प्रश्नाकडे दादांच्या ढालीचे दुर्लक्ष

जाहीरपणे दिली समज

अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर त्यावेळी अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर जाहीरपणे अमोल मिटकरी यांना समज दिली होती. त्यानंतर आता मिटकरी यांची टर्म संपण्याची वाट अजित दादा बघत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनेक नेत्यांनी दिली. लवकरच मिटकरी यांची टर्म संपल्यानंतर विजय देशमुख यांच्या नावाची वर्णी लागणार आहे. त्यामुळे पक्षात आणि सक्रिय राजकारणात मिटकरी यांना कोणते स्थान मिळेल, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!