महाराष्ट्र

Ajit Pawar : वजाबाकीचे राजकारण महाराष्ट्राला अपायकारक

Maharashtra : राजकारणाचे कॅलक्युलेटर अजित पवारांच्या हाती?

Post View : 55

Author

अजित पवारांनी सांगलीतील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट केले की, पक्ष वाढीसाठी बेरीजचे राजकारण करा, वजाबाकी टाळा.

महाराष्ट्राचे राजकारण हे लोकांसाठी काही नवीन राहिलेले नाही. पण तरीसुद्धा प्रत्येक वेळी घडामोडींचा रंग नेहमीच ताजा आणि चुरशीचा असतो. सत्तेच्या समीकरणात कधी कोणाची बेरीज होते आणि कधी कोणाची वजाबाकी, हे कुणालाही कधी सांगता येत नाही. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या काळात यशवंतराव चव्हाण यांनी ‘बेरजेचे राजकारण’ करण्याचा मंत्र दिला होता. त्यांचा मुद्दा होता महाराष्ट्राच्या विकासासाठी समविचारी लोकांनी एकत्र येऊन सहमती निर्माण करावी. मात्र आता सहमतीपेक्षा समीकरण अधिक महत्त्वाची वाटू लागली आहेत.

बेरीज आणि वजाबाकी हीच खरी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणाची बनली आहे. या गणितावरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जोर दिला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेतील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले ‘बेरजेचे राजकारण करा, वजाबाकीचे करू नका.’अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सरळ बोलायले, मुद्द्याला भिडायचे आणि विरोधकांना चित करणे ही त्यांची नेहमीची शैली. यावेळीही त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले  की, पक्ष वाढवायचा असेल तर माणसं जोडली पाहिजेत.

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांनो मंत्र्यांच्या गाड्या थांबवा अन् जाब विचारा

छत्रपतींच्या शिकवणीचा आधार

वजाबाकी केल्याने फक्त नुकसानच होते. जातीवादाच्या आधारावर राजकारण करणे   महाराष्ट्राच्या हिताचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा दाखला देत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर जातिवाद आणि मतभेद सोडून ऐक्याचे  राजकारण करावे लागेल. त्यांनी जिल्हाध्यक्षांनाही सूचित केले की, आता राजकारणाचे गणित ‘बेरीज’ या शब्दाभोवती फिरले पाहिजे. अजित पवारांनी यावेळी त्यांच्या आगामी दौऱ्याचंही वेळापत्रक जाहीर केले. मुंबईत तीन दिवस आणि महाराष्ट्रभर चार दिवस दौरा करणार असून त्याची सुरुवात बीड जिल्ह्यातून केली आहे, असे त्यांनी सांगितले. याचा थेट अर्थ असा काढला जातो की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) संघटनात्मक विस्ताराची नवी रणनीती तयार झाली आहे. 

महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित गट मिळून सत्ता चालवत आहेत. अजित पवारांचे विधान हे कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन आहे की विरोधकांसाठी इशारा? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले  आहे. कारण, महाराष्ट्राचे राजकारण हे कधीच स्थिर राहिलेले नाही. सत्ता टिकवण्यासाठी पक्षांची बेरीज केली जाते, तर सत्तेसाठीच नवी वजाबाकी सुरू होते. आज अजित पवार  बेरीज करा असे सांगतात, पण विरोधक लगेचच प्रश्न विचारतात बेरीज कुणाशी आणि वजाबाकी कुणाची?

Bacchu Kadu : गृहमंत्र्यांच्या पोलिसांना निलंबनाचा फटका पुरेसा नाही

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!