धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकरी आपले घर आणि पीक गमावून जीवन संघर्ष करत आहेत. या संकटातच विजय वडेट्टीवारांनी लोकांच्या दु:खात नाचत असलेल्या उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यावर टीका केली.
पावसाच्या रौद्र रूपाने धाराशिवच्या मातीत हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे संसार पाण्याच्या लाटांबरोबर वाहून गेले. घरांचे छप्पर उद्ध्वस्त झाले. कष्टाची कमाई पिकांसह पाण्यात मिसळली. अशा संकटाच्या काळात, जिथे माणसाच्या मनाला आधाराची गरज असते. तिथे धाराशिवच्या मातीत एक वेगळाच तमाशा रंगला आहे. जिल्ह्याचा कारभारी, जो लोकांच्या दुखण्यावर फुंकर घालणारा हवा, तो स्वतःच्या मस्तीत मग्न आहे. नाचाच्या तालावर थिरकणारे पाय आणि गाण्याच्या सुरात रंगलेले क्षण. हे चित्र पाहून जनतेच्या मनात राग आणि निराशा उसळत आहे. ही कहाणी आहे एका नाचणाऱ्या नायकाची. ज्याने आपत्तीच्या काळातही मस्तीला प्राधान्य दिले.
जेव्हा गावागावांत पाण्याचा कहर कोसळतो. शेतकऱ्यांचे हात रिकामे होतात. तेव्हा प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे येणे अपेक्षित असते. पण धाराशिवमध्ये हे चित्र उलट आहे. जिथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याची गरज आहे. तिथे जिल्ह्याचा प्रमुख नाचाच्या तालात हरवला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या बेफिकिरीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या मते, हे नाचगाणे म्हणजे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारे लक्षण आहे. लोकांच्या अश्रूंना पुसण्याऐवजी, नाचाच्या मस्तीत रमणारे हे प्रशासन जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे.
प्रशासनाची बेफिकिरी
धाराशिवच्या मातीत शेतकऱ्यांचे आयुष्य पावसाने उध्वस्त केले आहे. पिके पाण्यात गेली. घरांचे स्वप्न पाण्याच्या लाटांबरोबर वाहून गेले. कष्टाची कमाई नष्ट झाली. अशा वेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून, मदतीचा हात पुढे करायला हवा. पण धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी आपत्तीच्या या काळात नाचाला प्राधान्य दिले. विजय वडेट्टीवार यांनी या वर्तनाला प्रशासनाच्या बेफिकिरीचे द्योतक म्हटले आहे. जेव्हा शेतकरी रडत आहे, तेव्हा जिल्ह्याचा कारभारी नाचत आहे. हे चित्र जनतेच्या मनात संताप आणि निराशा निर्माण करणारे आहे.
प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार द्यावा. नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. मदतीचा ओघ सुरू करावा, अशी अपेक्षा असते. पण धाराशिवमध्ये ही अपेक्षा पाण्यातच बुडाली आहे. नाचगाण्याच्या मस्तीत रमलेले जिल्हाधिकारी पंचनाम्यांसाठी वेळ काढतील तेव्हाच मदत मिळेल, असे चित्र आहे. विजय वडेट्टीवार यांनी या बेफिकिरीवर तीव्र टीका करत, अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकार आणि प्रशासन एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जर या बाजू कमकुवत असतील, तर सामान्य माणसाने कुठे जायचे?
Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांचा आक्रोश अनुत्तरित, सरकारची निष्क्रियता उघडकीस
या नाचगाण्याच्या तमाशातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे प्रशासनातील संवेदनशीलतेचा अभाव. ज्या वेळी शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्या वेळी प्रशासनाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. पण धाराशिवमध्ये हा खांब कुठे आहे? नाचणाऱ्या अधिकाऱ्यांचे हे वर्तन म्हणजे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे आहे. विजय वडेट्टीवार यांनी या बेफिकिरीवर बोट ठेवत, प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या अश्रूंना न्याय मिळाला पाहिजे. प्रशासनाने आपल्या कर्तव्यात कसूर न करता, जनतेला आधार द्यावा, हीच खरी अपेक्षा आहे.
