अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संकट वाढत असताना, भाजपच्या मूकतेवर काँग्रेसने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरच्या कामठी येथील दोन दिवसीय शिबिरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि शहरी राजकारणात नवसंजीवनीसाठी ठोस पावले उचलली गेली.
महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, भाजपाच्या कोरड्या घोषणांनी बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अहिल्यानगर दौऱ्यात शेतकऱ्यांच्या संकटावर एक शब्दही न बोलता त्यांनी उपेक्षेचा नवा उच्चांक गाठला. याचवेळी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरच्या नागलोक कामठी येथील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात भाजपाच्या शेतकरी-विरोधी धोरणांवर सडेतोड टीका करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आक्रमक लढ्याचा पवित्रा घेतला. या शिबिराच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी सरकारच्या हतबलतेचा पर्दाफाश केला. ज्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोशाची लहर उसळली.
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला काँग्रेसने शहरी राजकारणात नवसंजीवनी देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. सपकाळ यांच्या नेतृत्वाने पक्षाने शेतकऱ्यांच्या मागण्यांना ताकद दिली. तर आगामी महानगरपालिका निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांना सज्ज केले. ‘आजचे शहरी राजकारण’ या कार्यशाळेने शहरी भागातील जनसंपर्क मजबूत करण्याचे व्यावहारिक मार्ग दाखवले. ज्यामुळे काँग्रेसला नव्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
Parinay Fuke : मानस ॲग्रो इंडस्ट्रिज बनले ग्रामीण विकासाचे इंजिन
भाजपची मूकता
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले, पण भाजपा महायुती सरकारने कवडीचीही मदत न करता शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवले. अमित शाह यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी प्रश्नांवर तोंड उघडले नाही. ज्याला सपकाळ यांनी शेतकऱ्यांचा घोर अपमान ठरवला. काँग्रेसने हेक्टरी 50 हजारांची तातडीची मदत, रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे-खते आणि कर्जमाफीच्या मागण्या लावून धरल्या. सपकाळ यांनी सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमागे भाजपाचा सहकार क्षेत्रावर कब्जा मिळवण्याचा डाव असल्याचा आरोप करत सरकारच्या निष्क्रियतेवर हल्लाबोल केला.
नागपूरमधील कामठी येथील कार्यशाळेत माजी महापौर, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सपकाळ यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर देत शहरांमध्ये पक्षाला बळकटी देण्याचे धोरण मांडले. विवेक वेलणकर यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे उपाय सांगितले. तर आशुतोष शिर्के यांनी बदलत्या राजकारणावर चर्चा घडवली. राजू भिसे यांनी घरपट्ट्याच्या चळवळीवर मार्गदर्शन केले. ज्यामुळे शहरी जनसंपर्काला चालना मिळाली.
IPS Rushikesh Reddy : पोलिसांचे अ’समाधान’; सावजीवर घातली बंदी
चंद्रपूरच्या वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 21 हजार मते मिळवणाऱ्या अली यांनी सपकाळ, खरगे, राहुल गांधी आणि प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला. तालुकाध्यक्ष तूळशीराम श्रीरामे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने चंद्रपूरात काँग्रेसला नवे बळ मिळाले. सपकाळ यांच्या नेतृत्वाने हा प्रवेश लोकशाहीच्या लढाईत काँग्रेसला नवी उभारी देणारा ठरला.
